वणी :
“लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!” या मंगलमय शब्दांतून ग्रामपंचायत कार्यालय, कायर यांच्या वतीने वणी शहर, कायर वासियांना व परिसरातील सर्व नागरिकांना दिवाळी व भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
दिवाळीचा सण समाजात आनंद, उत्साह, बंधुभाव व सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. या सणानिमित्त प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी, आरोग्य, यश व समाधान लाभो, तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे, असे आवाहन सरपंच नागेश धनकसार यांनी केले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय, कायर यांच्या वतीने सर्व वणी वासीयांना पुन्हा एकदा दिवाळी व भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या