वणी :
संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वणी येथील येरेंडेल तेली समाजबांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवत सामाजिक संघटनाचा ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी येरेंडेल तेली समाज हितकारणी मंडळ, वणी या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली असून समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी आक्रमक वाटचाल करण्याचा संकल्प करण्यात आला. संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये समाजहितावह बाबींमध्ये तत्पर सहभाग, वर-वधू परिचय मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, तसेच शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक उपक्रम राबविण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला.
- अध्यक्ष – शरद रामराव तराळे
- उपाध्यक्ष – संजय तुळशीराम सहारे
- सचिव – सागर सुधाकर समर्थ
- सहसचिव – राहुल सुरेश कोलते
- कोषाध्यक्ष – मोहन भास्कर भरटकर
- संचालक – किशोर गुलाब तराळे, प्रशांत आनंदराव कावळे, लोकेश रामजी तराळे, गणेश कैलास भरटकर, अक्षय बबन समर्थ
कार्यक्रमास ज्येष्ठ समाजबांधवांची मार्गदर्शक उपस्थिती लाभली, ज्यामुळे नव्या कार्यकारणीला बळ मिळाले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था भक्कम, संघटित आणि कृतीशील भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या