📌 नेतृत्वाचा दमदार मेळावा – प्रतिस्पर्ध्यांची झोप उडाली
या प्रचारयात्रेत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पुढाकार घेत सर्व कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण केला. त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि ‘विकास हाच धर्म’ या भूमिकेने उपस्थित जनसमुदायात विश्वासाची लाट उसळली. सोबतच भाजपा प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, भाजपा शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, माजी शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, कवाडकर सर, अनुराग काथेड, आशिष जैन तसेच असंख्य भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक समर्थक यांनी उमेदवारांना ज्या उर्जेने साथ दिली, त्याची दखल विरोधकांना घ्यावीच लागेल.
📌 प्रभागात भाजपची एकतर्फी लाट
घरोघरी झालेली भेट, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तरुणांचा जोश, वयोवृद्धांचा विश्वास — सर्व मिळून भाजपच्या बाजूने जनमत कोसळत असल्याचे चित्र ठळकपणे समोर आले आहे.
विरोधकांनी गेल्या काही दिवसांत केलेले दावे, आरोप आणि दिशाभूल करणारे राजकारण यावर भाजपच्या आजच्या शक्तिप्रदर्शनाने अक्षरशः पाणी फेरले. पक्षाच्या संघटनशक्तीसमोर प्रतिस्पर्धी शून्यात जमा झालेले दिसत आहेत.
📌 प्रचारात आक्रमक मुद्दे — विकास विरुद्ध ढोंगी राजकारण
📌 वातावरण एकमुखाने: “ विजय फक्त भाजपचाच!”
प्रचार, एकजूट संघटना आणि जनतेचा विश्वास —
प्रभाग १० मध्ये भाजपचा विजय ‘ठाम’ आणि ‘अटळ’!






टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या