Type Here to Get Search Results !

“बावनकुळे वणीमध्ये आणि शहरातील समीकरणं उलटणार ? 29 नोव्हेंबरचा महाथरार!”

वणी : 

           निवडणुकीच्या केवळ काही दिवस आधी शहरात एक विचित्र तणाव जाणवत आहे. गल्ली–बोळात कुजबुज, चौकात चर्चा… आणि लोकांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न—  “29 नोव्हेंबरला नक्की काय घडणार आहे?”

      कारण या दिवशी भाजपकडून दाखवण्यात येणारे शक्ती–प्रदर्शन संपूर्ण राजकीय समीकरणे उलथवू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.

📌 सकाळची सुरुवात रॅलीच्या गडगडाटाने होणार


            शहरातील शासकीय मैदान येथे दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज उर्फ सचिन आत्राम आणि सर्व नगरसेवकांसाठी काढण्यात येणार आहे.  

         ही रॅली किती दमदार असेल?

         ही रॅली खरंच शहराचे नशीब बदलू शकते का?

        हे उत्तर मिळणार आहे… पण कोणालाच कल्पना नाही, प्रतिसाद किती प्रचंड असेल. विरोधक धास्तावलेत ? समर्थक उत्साहात, वातावरणात एक अनामिक स्पंदन जाणवत आहे.

📌 दुपारी ‘निर्णायक क्षण’—बावनकुळे यांची जाहीरसभा

              महाराष्ट्राचे महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची सभा दुपारी ०२ वाजता होणार आहे. ही सभा फक्त सभा नाही — राजकीय समीकरणांना झटका देणारा टर्निंग पॉईंट ठरू शकते, अशी चर्चा धुमाकूळ घालत आहे.

प्रश्न फक्त एकच—

                या सभेनंतर वणीची वाटचाल कोणत्या दिशेला वळणार ?


📌 2 डिसेंबर जवळ येत असलेला निकालाचा दिवस


     नगराध्यक्ष पद आणि 29 नगरसेवकांसाठी मतदान 2 डिसेंबरला.

    पण निर्णय ? कदाचित 29 नोव्हेंबरच लिहून जाईल.

                 भाजप नेत्यांनी वणीतील सर्व नागरिकांना 29 नोव्हेंबर रोजी नियोजित रॅली आणि जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

           रॅलीचा उत्साह, सभेतील उपस्थिती, आणि जनतेची आजची प्रतिक्रिया, सगळं काही वणीचं राजकारण हलवून सोडणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad