Type Here to Get Search Results !

17 वर्षांखालील मुलगी बेपत्ता; पालकांचा फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त

वणी  :

             भांदेवाडा परिसरातील एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी तिच्या नातेवाईक महिलेकडून वणी पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

                  मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी वयाच्या सुमारे 17 वर्षांची असून ती काही दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडून परत आली नाही. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी 24 सप्टेंबर रोजी दुपारी घरात एकटी असताना घराबाहेर गेल्याचे समजले. घरच्यांनी सायंकाळी परत आल्यावर ती घरी नसल्याचे लक्षात आले. तिचा मोबाईल फोनही घरातच होता.नातेवाईकांनी परिसरात व ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. काही लोकांच्या माहितीनुसार, ती घरातून स्कुटीने बाहेर पडल्याचे समजले आहे.

           कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलगी अजून अल्पवयीन असून ती अज्ञान वयात आहे. तिच्या निरागसतेचा फायदा घेत कोणीतरी तिला फूस लावून नेले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 25 सप्टेंबरपासून ते 6 ऑक्टोबरपर्यंत नातेवाईकांनी परिसरात सखोल शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही. 

              या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 (कलम 137(2)) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या