Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय चित्र व शिल्प स्पर्धा व प्रदर्शन – २०२५ : वणी येथे भव्य कलासोहळा! “तुमच्या कल्पकतेला मिळणार राज्यस्तरीय व्यासपीठ!”


वणी :
          कलात्मकतेचा सन्मान आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्व. हरिभाऊजी नागतूरे ग्रामविकास व बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, वणी तसेच वणी आर्टिस्ट स्पेस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “राज्यस्तरीय चित्र व शिल्प स्पर्धा व प्रदर्शन – २०२५” या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

                  या कार्यक्रमाला MIT Institute of Design (इंदूर), आव्हांतिक बायोटेक, शिवानी डिझाईन गॅलरी आणि विविध कलासंस्थांचे सहकार्य लाभले आहे. हा उपक्रम राज्यातील नवोदित आणि व्यावसायिक कलाकारांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार आहे.


      📌 कार्यक्रम स्थळ व वेळ : 

      लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
     २८, २९ आणि ३० ऑक्टोबर २०२५
       वेळ : सकाळी ११ ते सायं. ७

                 या तीन दिवसांच्या प्रदर्शनात विविध शैली, माध्यमे आणि विषयांवर आधारित चित्रकला व शिल्पकला सादर केल्या जाणार आहेत. राज्यभरातून कलाकार आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे.


       ३३ हजार रुपयांच्या पारितोषिकांसह सुवर्णसंधी!


📌     स्पर्धा दोन विभागांमध्ये होणार आहे —
                  विद्यार्थी विभाग आणि  कलाकार विभाग

🏆 पारितोषिकांचे तपशील :

🥇 प्रथम पारितोषिक – ₹५,०००/-
🥈 द्वितीय पारितोषिक – ₹३,०००/-
🥉 तृतीय पारितोषिक – ₹२,०००/-
🎖️ उत्तेजनार्थ पारितोषिक – ₹१,०००/-

              प्रत्येक सहभागीस स्पर्धा प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात येणार आहे, ज्यामुळे सहभागींच्या कलात्मक कारकिर्दीला नवी दिशा मिळेल.


सहभाग शुल्क :

📌 विद्यार्थी विभागासाठी :

१ कलाकृतीसाठी ₹२००/-

३ कलाकृतीसाठी ₹३००/-

📌 कलाकार विभागासाठी :

१ कलाकृतीसाठी ₹२५०/-

३ कलाकृतीसाठी ₹३५०/-

                        या नाममात्र शुल्काद्वारे स्पर्धकांना आपल्या कलाकृतींचे राज्यस्तरीय प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.


     📌 कलाकृती सादर करण्याची अंतिम तारीख :

    १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५
       सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
                                                    
       स्थानिक व राज्यातील सर्व इच्छुक कलाकारांनी दिलेल्या कालावधीत आपली कलाकृती सादर कराव्यात. या कलाकृतींचे मूल्यांकन तज्ज्ञ परीक्षकांद्वारे केले जाणार आहे.

📌 आयोजक मंडळ :
                    स्व. हरिभाऊजी नागतुरे ग्रामविकास व बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, वणी
       संचालक : शिक्षक प्रकाश नागतुरे
     समन्वयक : कलाशिक्षक प्रा. प्रदीप नागतूरे
        सहाय्यक समिती : कपिल राऊत सर, म्हसे सर, उमेश रासेकर सर, चंद्रकांत नक्षिने सर, अशोक क्षीरसागर, वैभव नागतुरे सर

📞 संपर्क क्रमांक :


📌  या स्पर्धेचे वैशिष्ट्य :


   राज्यातील अग्रगण्य कलावंतांचे थेट मार्गदर्शन

विविध माध्यमातील चित्रे व शिल्पांची प्रदर्शनी

युवा कलाकारांसाठी प्रेरणादायी वातावरण

कलासंवर्धनासाठी सर्जनशील व्यासपीठ


🎨✨ “तुमची कला हीच तुमची ओळख – या व्यासपीठावरून तुमच्या प्रतिभेला मिळवा राज्यस्तरीय मान्यता!” ✨🎨

                          राज्यातील सर्व चित्रकला व शिल्पकला प्रेमी कलाकार, विद्यार्थी आणि रसिकांनी या भव्य कलोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या