प्रतिनिधी / कोरा (मंगेश राऊत) :
उच्च शिक्षणाकरिता ग्रामीण भागात असलेले मागासलेपण दूर करण्याकरिता नेचर फाउंडेशन नागपूर यांचे तर्फे तालुक्यातील शिवापूर (बंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 25 डिसें.ते 28 डिसेंबर चार दिवसीय महाराष्ट्रातील तिसरे शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात सहभागी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांनी बदलासाठी बांधिलकी वचनबद्ध केली.
नेचर फाउंडेशन नागपूरच्या वतीने दरवर्षी बांधीलकी शिबिराचे आयोजन केले जाते ज्याद्वारे शिबिरार्थींना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासापासून सर्वांगीण गुणवत्ते करिता विविध क्षेत्रात तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन केले जाते.महाराष्ट्रातील तिसरे बांधिलकी चार दिवसीय शिबिर शिवापुर बंदर येथे घेण्यात आले बांधिलकी एक सामाजिक कर्तव्य या भूमिकेतून देशात स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवी वर्षात सुद्धा उच्च शिक्षणातील शिष्यवृत्ती व इतर योजनातील ग्रामीण भागाचे मागासलेपण यावर प्रकाश व मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक मानव अधिकार संरक्षण मंच चे आशिष फुलझले, ओबीसी स्टुडन्ट राईट असोसिएशन चे उमेश कोराम, पिरामल फाउंडेशन चे रमेश जायनाकर, निर्माण टीमचे समन्वयक सिद्धेश्वर भुजबळ आणि प्रज्वल सोनलवार, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईचे रिसर्च ऑफिसर ममिता मडावी, अजीम प्रेमजी विद्यापीठातील विद्यार्थी विशाल मसराम,पूजा चाफले तसेच अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याकरिता अभाअनिस महाराष्ट्र राज्य चे युवा संघटक पंकज वंजारे तर कलाक्षेत्रातील करिअरच्या संधी सांजविहार म्युझिक अकॅडमी चे संचालक जगदीश गोमील्ला, लिंग व असमानता या विषयावर समाजबंध चे संस्थापक सचिन आशा सुभाष, स्पर्धा परीक्षा या विषयांवर जॉईन कमिशनर नाशिक अभय नन्नावरे या सर्व मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात आले होते.
शिबिरात लोकशाही, शैक्षणिक वास्तव स्थिती, अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन,मनोरुग्ण सामाजिक बांधिलकी,लैंगिक असमानता, कॉलेज कडून होणारी विद्यार्थ्यांची लूट,विविध शिष्यवृत्ती,कला क्षेत्रातील संधी, स्पर्धा परीक्षे पलीकडील जग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरार्थ्यांच्या दिवसाची सुरुवात अनापान करून करण्यात येत होती.शिबिरार्थ्याने गावातील शैक्षणिक इतर भौतिक सुविधा या संदर्भात गावाचा सर्वे केला. देशातील ज्वलंत विषयांवरती दररोज विविध विषयांवर पथनाट्य सादरीकरण करून गावात जनजागृती करण्यात येत होती.
सर्व शिबिरार्थ्यांनी सामाजिक लोकशाहीतून बांधिलकीतून निर्माण झालेल्या मॅजिक या उपक्रमाला व बेवारस,मनोरुग्ण असणाऱ्या लोकांना निवारा देणाऱ्या दिव्यवंदना आधार फाउंडेशन या आश्रमाला भेट दिली व यातून विद्यार्थ्यांनी खऱ्या माणुसकीचे दर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावात नक्कीच बदल करू असे वचन घेतले.
शिबिराचे उद्घाटन नेचर फाउंडेशनच्या सल्लागार आशिष फुलझले यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी नेचर फाउंडेशनचे संस्थापक निलेश नन्नावरे, उपाध्यक्ष बादल श्रीरामे, सदस्य आशिष जीवतोडे,अमोल कावरे, समन्वयक स्नेहा नन्नावरे,निखिल मोडक,गुंजन सावसाकडे,मंगेश राऊत, तेजस्विनी भोयर, वैभव तलमले, प्रमोद शेंडे , प्रदिप भुरे, विक्की सोनवाने उपस्थित होते.
या बांधिलकी सारख्या शिबिरातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लोकल टू ग्लोबल आणि ग्लोबल टू लोकल या विचारांची पेरणी निर्माण होऊन भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी शासकीय धोरण निर्मितीमध्ये अग्रेसर होईल व आपल्या समाजाप्रती बांधील राहून प्रत्येक विद्यार्थी आपल्या गावासाठी काम करेल.असा विश्वास नेचर फाउंडेशनचे संस्थापक सचिव निलेश ननावरे यांनी व्यक्त केला.
"ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांचे उच्च शैक्षणिक क्षेत्राबद्दल असलेले अज्ञान दूर करून या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करण्याकरीता मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेवून पालक व विद्यार्थ्यांना योग्य दिशा देवू."
- निलेश नन्नावरे (संस्थापक नेचर फाउंडेशन)

.jpg)



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या