Type Here to Get Search Results !

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यानांचे आयोजन

वणी : 

        भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या  दि. १ जाने. २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे सकाळी  ७.३० वाजता मोफत रक्त गट तपासणी शिबीर व सायंकाळी ६.३० वा. शुरविरांना अभिवादन आणि सन्मान समारंभ कार्यक्रमाचे आजोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक व्यक्तींचा सन्मान होणार आहे. या कार्यक्रमाचे उ‌द्घाटक म्हणून वणीचे आमदार संजय देरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय नगराळे व प्रमुख अतिथी म्हणून गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी  मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होत आहे.

व्याख्याते  दत्ता डोहे यांचे व्याख्यान भिमा कोरेगांव शुरविरांचा इतिहास या विषयावर होणार आहे. 

                  यावेळी  पुरूषोत्तम पाटील,मोरेश्वर देवतळे, सुरेश रायपुरे, करूणा कांबळे, ईजहार शेख, संबा वाघमारे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तरी कृपया या कार्यक्रमास आपण आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन द ग्रेट पिपल्स ग्रुप वणी च्या वतीने आयोजकांनी केली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad