भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी महोत्सवा निमित्ताने दि. 26 डिसेंबर 2024 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मारेगाव येथील पक्ष कार्यालयावर कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. दि. 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर उत्तरप्रदेश येथे स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 99 वर्षे पूर्ण होऊन 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्ष सभासद व त्यांचे कुटुंबीय तसेच समाजवादी, आंबेडकरवादी, कामगार - कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी - युवक, साहित्यीक - सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार, वकील,सहानुभूतीदार, धर्मनिरपेक्ष पक्ष तथा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कार्यालयावर शहराचे लक्ष वेधेल अशी रोषनाई करण्यात आली. काॅ.अनिल हेपट यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. लाल झेंड्याला सलामी दिल्यांनंतर मेळावा झाला. अध्यक्षस्थानी काॅ.मोतीराम धनरे तर अतिथी काॅ.अनिल हेपट, अनिल घाटे, वासुदेव गोहणे, बंडु गोलर, प्रविण आडे, ॲड. संजय मडावी,ॲड. मेहमुद खाॅ.पठाण, गणेश कळसकर, पंढरी मोहीतकर, तालुका सचिव विलास ढुमणे होते. प्रस्तावना अनिल घाटे ,संचालन बंडु गोलर तर आभार प्रदर्शन प्रविण आडे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या