वणी :
स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालय येथील बी.एस्सी प्रथम वर्षाला असलेल्या कशिष कुकडेजा व आएशा खान यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात संपन्न झालेल्या आविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव चमकवले आहे.दरवर्षी विद्यार्थ्याच्या संशोधन कल्पकतेला वाव देण्यासाठी आविष्कार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. अगोदर ही स्पर्धा जिल्हास्तरीय घेण्यात येते. त्यामध्ये त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देवुन गौरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांची निवड विद्यापीठस्तरीय आविष्कारसाठी करण्यात आली. २३ व २४ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत मानवता, भाषा, ललित कला या विभागात पदवी पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. आता त्यांची जानेवारी महीन्यात होवु घातलेल्या रायगड येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी कौतुक केले आहे. वाळवलेल्या फुलापासुन व पानांपासुन कलात्मक वस्तु बनविल्या आहे. यासाठी त्यांना वनस्पतीशास्त्र विभागाचे डाॅ. अजय राजुरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वस्तूंची निर्मिती करण्यात आली. सोबतच वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. रविंद्र मत्ते व प्राध्यापक संघदीप ऊके , मनिष पेटकर , हेमंत मालेकार आदीचे सहकार्य लाभले.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या