Type Here to Get Search Results !

अंधश्रद्धा आणि व्यसन एका नाण्याच्या दोन बाजू -गजेन्द्र सुरकार

 प्रतिनिधी / वर्धा (मंगेश राऊत) : 

                                         अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे अनिष्ट अघोरी कालबाह्य रूढी,प्रथा परंपरा यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा करून त्याला पर्याय म्हणून महाराष्ट्रातील होऊन गेलेल्या संत विचारवंत यांनी दिलेले पर्याय व विचार याबाबत प्रबोधन करणे होय. व्यसन हा माणसाला अविवेकी बनवितो ज्याप्रमाणे अंधश्रद्धा जपणारा अविवेकी बनवितो अंधश्रद्धा व व्यसन माणसाला गुलाम बनवितो त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 35 वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती यावर प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. कारण समिती मानते अंधश्रद्धा आणि व्यसन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे मत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समितीचे राज्य प्रधान सचिव व विवेक जागर संस्थेचे संचालक गजेंद्र सुरकार यांनी व्यक्त केले.

         महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला संघटीत कामाला 35 वर्ष पूर्ण झाले त्याचे औचित्य साधून दि 27,28,29 डिसेंबर ला आळंदी येथे 35 वर्षपुर्ती अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे त्याबाबत प्रचार प्रसार प्रसिध्दी व्हावी या उद्देशाने शाळा महाविद्यालये महिला मंडळ बचतगट यांच्यात प्रबोधन व्हावे यासाठी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन विदर्भातील अकराही जिल्ह्यासह वर्धेतील संपूर्ण तालुक्यात व मोठ्या शहरात प्रबोधन यात्रा काढण्यात आली याचे औचित्य साधून कारंजा घाडगे तालुक्यातील उमरी गावातील राष्ट्रीय माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार शाळेचे मुख्याध्यापक श्री तिरभाने, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या जिल्हा कार्यवाह रजनी सुरकार,अक्षय सुरकार  व ईतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थी व तरुण तरुणी यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारावा कारण मानवी सभ्यता उत्क्रांत होण्यासाठी व आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जाण्यासाठी त्याचा उपयोग झाला त्यासाठी अनेक पिठ्या या नेस्तनाबूत झाल्या धर्माने या लोकांना छळ करून मारले तरी वैज्ञानिक दृष्टिकोन अबाधित आहे म्हणूननच तो भारतीय नागरीकांचे कर्तव्य म्हणून संविधानातील 51 कलमा अन्तर्गत समाविष्ट करण्यात आले आहे तर शैक्षणिक मुल्य म्हणून ते समाविष्ट करण्यात आले आहे.

           मानवी प्रश्न, समस्या,अडी अडचणी सर्व प्रकारच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन यापेक्षा वेगळा मार्ग नाही तो स्विकारावा व विवेकी समाज निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे यासोबतच सर्वांनी सर्व प्रकारच्या व्यसनापासून दुर राहून व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी स्वतःला व्यसनापासून दूर ठेवावे यामुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ राहील त्यामुळे अनेक जिवघेण्या व मोठ्या खर्चाच्या उपचारापासून आपण दूर राहून आपली आर्थिक परिस्थिती चांगली करू शकतो असेही आवाहन गजेंद्र सुरकार यांनी सविस्तर माहिती देताना केले यासोबतच अनेक प्रकारचे चमत्काराचे प्रयोग करून त्यामागील बुवा बाबा देवी माता कसे बदमाशी, हातचलाखी,वस्तूत घडामोड, अनेक रासायनिक पदार्थाचा उपयोग करून कसे चमत्काराच्या नावाने फसवतात लैंगिक शोषण करता ते हे प्रात्यक्षिका व्दारे समजावून सांगितले यासोबतच विषारी बिनविषारी साप कसे ओळखायचे, सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा गैरसमज,विषारी सापांच्या दंशाची लक्षणे उपचार, प्रथमोपचार,त्यावर असलेले एकमेव औषध प्रतीसर्पविष ॲन्टीस्नेकव्हेम याची माहिती दिली सोबतच महाराष्ट्र शासनाने पारीत केलेला जादुटोणा विरोधी कायदा याची थोडक्यात माहिती दिली.

           कार्यक्रमाला विध्यार्थी,शिक्षक,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक मुख्याध्यापक तिरभाने यांनी केले आभारप्रदर्शन रजनी सुरकार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad