प्रतिनिधी / समुद्रपूर (मंगेश राऊत) :
महाराष्ट्रातील शैक्षणिक पात्रताधारक युवक आणि युवतीना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात आली. बारावी पास, पदविका आणि पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा, आठ आणि दहा हजार रूपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले, पण विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. तसेच हे विद्यावेतन तुटपुंजे असल्याने प्रशिक्षणार्थांची हेळसांड होऊन त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असल्याने नियमानुसार काम आणि वेळेवर विद्यावेतन द्यावे. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपल्यावर दोन महिन्यानंतर आमचे काय होणार, आमच्यावर उपासमारीची वेळ येणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या बाबत तहसीलदार कपिल हाटकर यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कौशल्य व उद्योजगता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमचे लाडके भाऊ यांनी जिथे काम करत आहेत तिथेच कायम (पर्मनंट) होतील, असे आश्वासन दिले आहे, हे आश्वासन पूर्ण करावे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल, असे म्हणून युवक आणि युवतींच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. याआशा निराशेत रूपांतरित होऊन देता युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यावा. असेही दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.
• प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतीच्या मागण्या
मानधनात दुप्पट वाढ करण्यात यावी. प्रशिक्षणार्थीना आहे त्या आस्थापनेवर कायमस्वरूपीकरण्यात यावे, सुट्या शासकीय नियमाप्रमाणे देण्यात यावे,
• ओळखपत्र देण्यात यावे,
• बेसिक नुसार कपात करण्यात यावा व इतर भत्ते लागू करण्यात यावे अशी तहसीलदार कपिल हाटकर यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या