वणी :
या स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्हातील वणी शहरामध्ये शेतकरी नगर येथे वास्तव्यास असलेले अक्षय गणेशराव खामनकर यांनी पाचवा क्रमांक पटकावला असून सन्मानचिन्ह प्राप्त केले.
⭕ शरीरसौष्ठव स्पर्धा म्हणजे ?
शरीरसौष्ठव म्हणजे मानवी शरीराचा सुडौल आणि सुबद्ध आकार होय. शारीरिक उंचीच्या प्रमाणात वजन असणे आणि खांदे, मान, छाती, कंबर, बाहू, पाय, पोटऱ्या यांची वाढ सतमोल प्रमाणात झालेली असणे, तसेच स्नायूंची प्रमाणबद्ध वाढ व पिळदारपणा या घटकांना शरीरसौष्टवात अतिशय महत्त्व आहे. बळकट, चपळ आणि बांधेसूद शरीरसौष्टवासाठी दीर्घकालीन, योजनाबद्ध व्यायामाची आवश्यकता असते. शरीरसौष्ठव-स्पर्धकास आपल्या उंचीच्या आणि अस्थिरचनेच्या प्रमाणात आवश्यक असे जास्तीत जास्त वजन प्राप्त करावे लागते. शरीरसौष्ठवासाठी प्रमुख व्यायाम म्हणजे वजन उचलणे होय. 'टू हँड्स मिलिटरी प्रेस' (बाहू व खांद्यांसाठी) 'उतरत्या फळीवरचे सिटअप्स' (कंबर, छाती यांसाठी), लँट मशीन' (पाठ व खांदे यांसाठी), 'डंबेल्स प्रेस' (खांदे व दंड यांसाठी), 'ट्रंक बेडिंग' (बाहू व पाठीचा कणा यांसाठी) हे शरीरसौष्ठवासाठी आवश्यक असलेले, वजन उचलण्याचे काही व्यायामप्रकार होत. संपूर्ण शरीराची प्रमाणबद्धता साधण्यासाठी नियमित व्यायाम व साराव आणि योजकता यांचा मेळ साधावा लागतो. शरीराच्या कोणत्याही भागाची कमी वा जास्त वाढ होऊ नये, म्हणून व्यायाम करताना विशेष दक्षता घ्यावी लागते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या