Type Here to Get Search Results !

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार! वणी विधानसभा विकासाची बुलेट ट्रेन

वणी : 

            संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ लागू झाली आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झाली असून, २० नोव्हेंबर ला मतदान होवून २३ तारखेला निकाल जाहीर करून, निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. आता याच दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून प्रचारास प्रारंभ केला आहे.

       यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वच उमेदवारांचा जोरदार प्रचाराचा झंझावात नागरिकांना पहायला मिळत आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते गावोगावी भेटी देत आहेत, शहरात छोट्या सभा, कॉर्नर सभा घेत प्रचार करीत आहेत.

        वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर शहरातील आणि ग्रामीण भागात प्रचार करीत आहेत. मतदारांनी तिसऱ्यांदा संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आमदार करून वणी विधानसभा विकासाची  बुलेट ट्रेन धावत ठेवावी, असे आवाहन कार्यकर्ते, करताना दिसत आहेत. 

      संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचारामध्ये वेग घेत, प्रचार दौरामध्ये गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत. या दौराला लोकांचा देखील प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहेत. यामध्ये नागरिक आपल्या भागातील विकास आणि निवडणुकी संदर्भात चर्चा करत आहे. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठींबा देत असून २० तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून संजीवरेड्डी बोदकुरवार यांना विजयी करून गुलाल उधळनार अशी ग्वाही देत आहेत. 

📌आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केलेली विकासकामे

                    सन २०१४ ते २०२४ या कार्यकाळात २००० कोटी पेक्षाही जास्त रुपयाचा विकास निधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या  विशेष प्रयत्नातुन उपलब्ध करून देण्यात आला. तसेच राज्यसरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजनेअंतर्गत वणी विधानसभा क्षेत्रातील ८४ हजार लाडक्या बहिणींना लाभ मिळवुन देण्यात आला. त्याबरोबरच CRIF चिखलगांव रेल्वे गेट ते तप स्टॅण्ड ते टिळक चौक ते वरोरा रेल्वे गेट पर्यंत सिमेंट रस्ता व स्ट्री लाईटचे काम करणे, प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, नागरी स्वराज्य संस्था सेवा व सुविधा पुरविणे नगर विकास विभाग वणी शहर सिमेंट रस्ते व नाली रुंदीकरण जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत रस्ते, सभागृह, सोलर लाईट, सोलर पंप जलशुध्दीकरण संवत्र बस स्टॅण्ड मारेगांव, शाळा डिजीटल, वाचनालय, फॉयर ब्रिगेड वाहन, इ. कामे वणी शहराकरीता पाणी पुरवठा योजना (२४ तास) तसेच अमृत-२ योजने अंतर्गत मंजुर निधी, दलित वस्ती निधी अंतर्गत विकास कामे, नाट्यगृह इमारत (BSNL Office), खनिज विकास निधी अंतर्गत वणी येथे भव्य क्रिडा संकुल , इत्यादी विविध विकासकामे करण्यात आली.  काही कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पूर्ण होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad