Type Here to Get Search Results !

आता ही निवडणूक संजय खाडे ची राहीली नसून जनतेची झाली आहे

वणी : 

           संजय खाडे यांनी कमी वेळातच मतदारसंघात खूप लोकप्रियता मिळवली आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. संजय खाडे यांचा वणी शहरासह, ग्रामीण भागातही जोरदार प्रचार सुरू आहे. 

       संजय खाडे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधत असताना ग्रामीण नागरिक संजय खाडे जनहित केंद्रामुळे अनेक कामे सोपी झाले आहेत. तसेच गावातील हजारो लोकांचे कामे झाले, अशी आवर्जून कामाची पावती देत आहेत. संजय खाडे यांनी केलेल्या कामामुळे गावातील लोकांच्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहेत. त्यामुळे गावकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असून यावेळेला संजय खाडे यांनाच आमदार करणार असा निर्धार गावकऱ्यांकडून केला जात आहेत. 

         तसेच अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी वणी विधानसभेचा सखोल अभ्यास करून विकासाची दृष्टी घेत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक असणारे पक्के पांदण रस्ते, शेतमालाला हमीभाव, अखंडीत वीजपुरवठा, शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध करून देणार. 

       त्याबरोबरच तरुणांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न म्हणजे वाढलेली बेरोजगारी त्या सबंधी पाठपुरावा करून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. अशा विविध क्षेत्रामधील विकासासाठीचा वचननामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये महिला, माझा शब्द, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा, प्रदूषण मुक्त वणी शहर करणार असा निर्धार केला आहे. 

      वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेचा कौल संजय खाडे यांच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. विविध संघटना त्यांना पाठींबा देताना पाहायला मिळत आहे.  या २० तारखेला शिट्टी ला मतदान करून संजय खाडे यांना विजयी करणार असा गावकऱ्यांचा सुर पाहायला मिळत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad