वणी:
विदर्भ दौऱ्यावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणीच्या भेटीत पक्षाचे नेते राजु उंबरकर यांना उमेदवारी जाहीर करुन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच पाश्र्वभूमीवर राजु उंबरकर हे उद्या २५ ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. वणी उपविभागीय कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी ०८ वाजता वणी येथील शासकिय मैदानावर छोटे खानी सभा आयोजित करून ते मतदारांचा आशीर्वाद घेणार आहेत.
या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, पदाधिकारी यांच्यासह वणी, मारेगावं, झरी या तिन्ही तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सभेनंतर रॅली काढण्यात येवून राजु उंबरकर हे समर्थकांसह नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. राजु उंबरकर यांच्या उमेदवारीने पक्षात चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटी गाठीत आणि प्रचारात आघाडी घेतली आहे तर सोशल मीडियाच्या माध्यामतून उंबरकर यांच्या नावाला सर्वाधिक पसंती पहावयास मिळत आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या