Type Here to Get Search Results !

नेचर फाउंडेशनने दिला विद्यार्थ्यांना ग्रामीण चाकोरीबाहेर जाण्याचा मंत्र

प्रतिनिधी /कोरा( मंगेश राऊत) :

                        चिमूर येथे नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर व आदिवासी मुलींचे व मुलांचे शासकीय वस्तीगृह नागभीड येथील बारावी व पदवीच्या सर्व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती देण्याकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 

               या कार्यशाळेमध्ये नेचर फाउंडेशनचे संस्थापक निलेश नन्नावरे यांनी विद्यार्थ्यांना आय.आय. टी. हैद्राबाद, गांधीनगर अजीम प्रेमजी यूनिवर्सिटी बंगळूर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई या व देशातील इतर नामांकित असणारे विद्यापीठ या ठिकाणी आपल्याला प्रवेश घेण्याकरिता असणारी प्रवेश प्रक्रिया त्याची संपूर्ण जबाबदारी ही नेचर फाउंडेशन घेईल, असे वचन देऊन तळागाळातील ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांची होतकरू विद्यार्थ्यांनी विद्यापीठांमध्ये शिक्षण घ्यावे.

       याकरिता महाराष्ट्रात विद्यापीठातील चिमूर, विदर्भ, विद्यार्थ्यांच्या समस्या, कॉलेजमधील फी संदर्भातील समस्या, शिष्यवृत्तीच्या समस्या वस्तीगृहातील प्रवेश समस्या या सर्व समस्यांवरती नेचर फाउंडेशन काम करीत आहेत.यामुळे गेल्या चार वर्षात हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण हे जिल्हा विभागाच्या ठिकाणी राहून प्रवेश व शिक्षणाचा प्रमाण वाढण्यास नेचर फाउंडेशन मदत करीत आहे.या कार्यक्रमाला प्राचार्य आनंदे ग्रामगीता महाविद्यालय, प्राचार्य चंदेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर, गृहपाल देवुळकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad