Type Here to Get Search Results !

प्रदुषण मुक्त दिवाळी उत्साहाने साजरी करा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत) : 

               महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग आणि विविध उपक्रम विभागामार्फत दरवर्षी प्रदुषण मुक्त दीपावलीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन साजरा करण्याचे आवाहन करण्यात येवून संपुर्ण महाराष्ट्रात शाळा महाविद्यालये यात समितीच्या 465 शाखांमधून प्रबोधन मोहीम राबविण्यात येते.

विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना 

*चला आपण संकल्प करु या, प्रदुषण मुक्त दीपावलीचा आनंद घेऊ या* असे विनम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. 

प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करु या

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रबोधन मोहिमेच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य प्रशासनाने प्रदुषण मुक्त दिवाळी उत्साहाने साजरी करण्यासाठीही परिपत्रक काढले आहे त्यानुसार 

         शासन निर्णय क्र.इएनव्ही-2010/प्र.क्र.106/ता.क., मंत्रालय, मुंबई दि.3 मे 2011

    या शासन निर्णयानुसार कोणत्याही धर्मांच्या सणांचे साजरीकरण विशेषतः सार्वजनिक स्तरावर होणारे सणांचे साजरीकरण हे जनसमुदायाला नवचैतन्य देणारे असावे.जाणते अजाणतेपणी काही वेळा अशा साजरीकरणातून निसर्गाच्या जल,हवा,ध्वनी या प्रमुख घटकांचे प्रदुषण मानवी समाजासाठी हानीकारक ठरत असते. ते हितकारक नाही.आता येणाऱ्या दिवाळी सणात फटाके फोडल्यानंतर होणारे प्रदुषण हे दरवर्षी प्रदुषण नियंत्रण मंडळ मोजत असते, ते वाढतच आहे,ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्यात सुमारे पाचशे कोटी रुपये किंमतीची फटाके फोडले जातात.दिवाळी सणापूर्वी आणि दिवाळी सणानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळ हवेतील प्रदुषणाची नोंद घेत असून प्रदुषण पातळी वाढलेली आढळते.

        

        महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि काही पर्यावरण प्रेमी संघटनांच्या पुढाकाराने दरवर्षी सुमारे पंचवीस ते पन्नास कोटी रुपये किंमतीची फटाके कमी फुटतात.शालेय विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून मी गेल्या वर्षापेक्षा किमान शंभर रुपये किंमतीची फटाके कमी फोडेन असे वदवून या उपक्रमाद्वारे वातावरणातील  प्रदुषित घटकांचे उत्सर्जन कमी केले जाते.

        तसं बघितलं तर फटाक्यांचा शोध हा चीन या देशात लागला.पक्ष्यांचे पिकांपासून संरक्षण व्हावे या हेतूने फटाके फोडून पक्षी पळविले जात होते. आपल्या भारतात गेल्या काही वर्षांपासून फटाके फोडणे सुरु झाले.त्यापूर्वी भारतात दिवाळी सण म्हणजे दिव्यांच्या सण दीपोत्सव म्हणून साजरा होत असे.चीन संस्कृती नकळत आपण कधी स्विकारली ते कळलेच नाही.

           फटाक्यांपासून कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनाॅक्साईड, सल्फर डाय ऑक्साइड,टार पार्टीकल्स फाॅस्फरसचे आॅक्साईड या सारखे विषारी वायू बाहेर पडतात.रंगित फटाक्यापासून वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचे आॅक्साईड्स तयार होऊन वातावरण प्रदुषित होते.त्यातील काही घटक कार्सिनोजेनीक म्हणजे कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात.काही प्रदुषित घटकांपासून फुफ्फुसांचे,हृदयांचे आजार होतात.पक्षी, गुरेढोरे, काही छोटे प्राणी यांच्या जीवनमानात बदल होऊन त्यांची संख्या कमी होत चालली आहे.जैवविविधतेचे नुकसान दिसत आहे.हवा आणि जल यांचे प्रदुषण होतेच होते.फटाके फोडताना  शरिराचे अंगही भाजते.

           शिवाय ध्वनिप्रदूषण हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होते.काहींना ह्रदय रोगांचे आजार असल्यास त्यांना ह्रदयाचे झटके येण्याची शक्यता असते.विशेषत: लहान बाळांना ध्वनिप्रदूषणापासून लांब ठेवावे लागते.ह्या वर्षी शासनाने ध्वनिप्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे ठरविले आहे.त्याचे महा. अंनिसने स्वागत केले आहे.

       शिवाय फटाके निर्मितीच्या कारखान्यात लहान मुले(बालकामगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे) तसेच बायकांना देखील काम करावे लागते.त्यांचे शोषण होतेच होते.अनेकदा दरवर्षी फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्याच्या नोंदी आहेत. त्या अपघातात अनेक कामगारांचा मृत्यू होतो यात मुलांचा,बायकांचा समावेश असतो,हे वेगळे सांगायला नको. ८० डेसीबलपेक्षा मोठ्या आवाजाच्या फटाके निर्मितीस या वर्षी बंदीचे आदेश दिले आहेत. आपण सर्वांनी फटाके न फोडता किंवा पर्यावरणाला प्रदुषित न करणारे फटाके न फोडता त्या रकमेतून खेळणे घेणे,गिफ्ट देणे,दिन,दुबळ्यांना मदत करणे, पुस्तके घेणे, भेटवस्तू मित्रांना,रिस्तेदारांना देणे आदी पर्याय अंमलात आणून आपण सर्वांनी 

         *प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करु या, दिवाळी सणाचा आनंद घेऊ या* असे आवाहन राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, उपाध्यक्ष यशवंत झाडे, दिलीप उटाणे, अरूण कुमार हर्षबाेधी,अनिल मुरडीव,राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे, सारिका डेहनकर, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले प्रधान सचिव सुनील ढाले तालुकाध्यक्ष अरूणभाऊ चवडे जिल्हा पदाधिकारी डॉ मंजुषा देशमुख डॉ माधुरी झाडे, हरिश पेटकर, व्दारकाताई ईमडवार , राजेंद्र ढोबळे, ,भरत कोकावार निखिल जवादे, कविता राठोड, कविता लोहट,प्रतिभा ठाकूर,संजय भगत आदिंनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad