विदर्भात राजू उंबरकर यांना सर्वप्रथम विधानसभेची उमेदवारी जाहीर करून राज ठाकरेंनी आपला विदर्भातील हुकुमी एक्का पुन्हा एकदा रिंगणात उतरवला. याच पार्श्वभूमीवर आज राजू उंबरकर यांनी शहरातून रॅली काढत आपल्या हजारो समर्थकांसह वणी विधानसभा मतदारसंघासाठी नामांकन अर्ज दाखल केला.
राज्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या वणी विधानसभा मतदार संघामध्ये मनसेने उंबरकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन निवडणूकीत सहभाग नोंदवला. जनतेच्या विविध अडी अडचणी व समस्यांना घेऊन उंबरकर नेहमी अग्रेसर असतात त्यामुळे भरभक्कम जनाधाराची वोट बँक मनसेकडे आहे. याच आधारावर पुन्हा एकदा राजू उंबरकर या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांनी आपल्या हजारो समर्थकांसह शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन रॅलीची सुरूवात करत शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलें. तर वणी येथील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर करुन माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात मागील काळामध्ये सुरू असलेल्या सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या राजकीय चिखल फेक,नेत्यांच्या कोलांट उड्या यामुळे जनता वैतागली असुन यंदा जनते समोर मनसेचा पर्याय उभा राहिला आहे.आज उंबरकर यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बोलले जात आहे.
राजु उंबरकर यांनी केलेल्या जणसेवेच्या कामामुळे जनता त्यांना यंदा साथ देवुन विजयाचा गुलाल उधळणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
यावेळी प्रिया लभाने (माजी नगराध्यक्ष वणी), ज्ञानेश्वर कोडापे(नगर उपाध्यक्ष न.प झरी) धनंजय त्रिंबके माजी आरोग्य सभापती, ॲड. निलेश चौधरी, अलका टेकाम ( माजी जिल्हा परिषद सदस्य), अंजूम शेख (नगरसेवक मारेगाव), अर्चना बोदाडकर, प्रवीण लेनगुळे (नगरसेवक) इरशाद खान, शंकर वरघट, फाल्गुन गोहोकार, रुपेश ढोके, गजानन मिलमिले, तृप्ती उंबरकर,उज्वला चंदनखेडे, गोविंदराव थेरे, अनिस सलाट, अरुणा थेरे, विलन बोदाडकर, विट्ठल बोथाडे, शुभम भोयर,शिवराज पेचे, चांद बहादे, संतोष चिटलावार, मयूर गेडाम, लक्की सोमकुंवर, बिलाल खान, रियाज मिस्त्री, रणजित बोंडे, साजिद खान, बंडू बोंडे, शहारुख खान, उदय खिरटकर, शम्स सिद्दीकी, सय्यद युनूस, वैशाली तायडे, शितल पिंपळशेंडे, यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या