Type Here to Get Search Results !

मारेगाव तालुक्यातील ॲड. पूजा मत्ते सुवर्णपदक पुरस्काराने सन्मानित

मारेगाव : 

            गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा 11 वा आणि 12 वा दीक्षांत समारंभ दि. 02 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन हे होते.

             या समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, प्रमाणपत्रे, पीएचडी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर येथील विद्यार्थीनी कु. पूजा देवराव मत्ते रा. वनोजा देवी (ता. मारेगाव) यांनी (LL. M) मास्टर ऑफ लॉ मध्ये सर्वांधिक मार्क्स घेऊन मेरिट मध्ये आल्या आहेत. याबद्दल दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे झालेल्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक (गोल्ड मेडलिस्ट) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    या समारंभात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे डीन आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad