मी पहिल्यांदा आमदारकीसाठी उमेदवारी केली त्यावेळी थोड्या मताने माझा पराभव झाला, मी त्यावेळी सुद्धा मतदांराचे आभार मानले त्यांनतर थांबलो नाही सत्तत ५ वर्ष जनतेच्या संपर्कात राहिलो आणि जनतेने मला दोन वेळा भरभरून मते देऊन विधानसभेत पाठविले. मी कधीही स्वताला आमदार समजलो नाही. कारण मला जनतेने आपला सेवक म्हणून विधानसभेत सेवा करण्यासाठी योग्य समजून पाठविले आणि मानव सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून मी रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी स्वताला झोकून घेतले.
तुमचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आणि तुमच्या मुळेच वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार बहुमान प्राप्त झाला असून तो माझा नाही तर मतदार संघातील जनतेचा आहे. काहि राजकीय लोकांना विधानसभा क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय आल्याने पोटदुखी होत आहे.
त्यामुळेच ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा विरोध करीत जनतेची दिशाभूल करीत आहे हेच नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात माझ्या विरोधात आंदोलन करुन माझ्या पोस्टरला जोडे मारले सोशल मीडियावर माझ्या विरोधात काय काय नाही लिहिले हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील कोरा सर्कलच्या वतीने आमदार समिरभाऊ कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल व जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरा गावा बाहेरील रहिमान फाट्यावरून भव्य रॅली काढून आमदार कुणावार यांच्या अनेक गावातील नागरिकांनी, विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक लहानुजी जोगवे, हभप शांताराम महाराज जामुनकर, किशोर दिघे, रामभाऊ पंढरे,संजय डेहणे, मोहन बाकरे, ईश्वर लोखंडे, रवि लढी, पुरुषोत्तम कोल्हे, गुलाबराव चिंचोलकर,केशव डंभारे,वामन चंदनखेडे, नामदेव चौके,रोशन चौके, किशोर नेवल,गजानन राऊत, पुष्पांजली नेवल,विजया तेलरांधे, अंकुश ठाकुर, नरेंद्र फोपडे, वसंतराव घुमडे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली. आमदार समिर कुणावार मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा सरकारकडून करताच हे महाविद्यालय हिंगणघाट मध्ये असे आणता येईल. यासाठी सातत्याने संबंधी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून आदी ४०० बेडचे रुग्णालय हिंगणघाट येथे मंजूर करून घेतले आणि त्यांनतर आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने वर्धा जिल्हा मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एका तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात यशस्वी ठरलो.
आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे होणार असून माझ्ये धैर्य पुर्ण होणार यांचा मला आंनद आहे. नवरात्र सुरू असताना कोरा परिसरातील येवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून माझा सत्कार व सन्मान केला यामुळे माझे मन भरून आले आहे. यापुढेही मी जनतेची सेवा करीत राहणार आहे व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पांदण रस्त्याचे कामे हाती घेणार आहो असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी किशोर दिघे, रोशन चौके यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मनोज बारस्कर, रोशन चौके, अरुण चौधरी, शुभम भगत, हेमंत राउत, बाबाराव कोसूरकर, राजेंद्र कावडे, नामदेव तपासे, गौरव नखाते आदिंसह गावातील नागरिकांना सहकार्य केले.








टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या