Type Here to Get Search Results !

भारतीय समाजात स्त्रीला सम्मानाने का जगता येत नाही - सारिका डेहनकर

प्रतिनिधि / वर्धा (मंगेश राऊत) :

                                 प्रत्येक पुरुष हा स्त्रीच्या उदरातूनच जन्म घेतो जन्मताच त्याला आई, आजी, मावशी, मामी, काकू पुतनी, मेहूणी आत्या, कालांतराने पत्नी, मुलगी असा गोतावळा मिळतो. या गोतावळ्यात तो रमतो नाते जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो तर भारतीय समाजात स्त्रीला सम्मानाने का जगता येत नाही. असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला विभागाच्या राज्यसहकार्यवाह सारिका डेहनकर यांनी उपस्थितांसमोर प्रबोधन करताना उभा केला.
         महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला विभागाच्या वतीने दरवर्षी नवरात्रात जागर स्त्री शक्तिचा या अन्तर्गत महिला विषयीचा प्रश्नावर  राज्यव्यापी प्रबोधन करण्यात येते. या वर्षी बदलापूर, कलकत्ता अशा अनेक शहरांत एक वर्षाची मुलगी ते सत्तर वर्षाच्या आजी वर नराधमांनी विनयभंग व बलात्कार सारखा दंडनीय अपराध केला यातून पुरूषाविषयी प्रश्न निर्माण झाले. समाजातील नैतिकता -हास पावत आहे का ? असा प्रश्न समाजशास्त्रज्ञासमोर निर्माण झाला यावर उत्तर शोधण्यासाठी व पर्याय काय असू शकतो यासाठी स्त्री सम्मानासाठी पुरूषभान संवाद हा विषय निवडून संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन मोहीम सुरू करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून वरूड येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय येथे स्त्री सम्मानासाठी पुरूषभान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         या प्रसंगी पुढे मार्गदर्शन करताना सारिका डेहनकर म्हणाल्या, जेव्हा त्या स्त्रीच्या आत्मसन्मानाची, स्वातंत्र्य, समता, अधिकार, संपत्तीत वाटा या विषयी कुटुंबात, समाजात प्रश्न निर्माण होतो तेव्हा तिचा विनयभंग, मारहाण, शिव्या, प्रसंगी हत्या या होतात तर अनेकदा कुटुंबातील व्यक्ती च बलात्कार सारखा दंडनीय अपराध करतो. तेव्हा स्त्रीच्या बाजूने ना कुटुंब ना समाज उभा राहतो. कारण आजही संपूर्ण भारतात महिलांच्या बाबत पुरूष दुपट्टी भुमिका घेतो. त्यामुळेच महिलांवर अत्याचाराचा कळस गाठल्या गेला आहे. हा कलंक प्रत्येक पुरूषाने प्रत्येक महिलेचा सम्मान जोपासण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा तरच महिलांवर होणारे बलात्कार, अत्याचार यांना आळा बसेल. कायदा कडक करून हे कमी होणार नाही तर घरातूनच माणूस म्हणून त्याचे संगोपण झाले पाहिजे नाकी एक पुरुष म्हणून.

        कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा यांच्या समन्वयातून क्षेत्रकार्य संस्था ग्रामपंचायत वरुड अंतर्गत जिल्हा परिषद शाळा वरुड येथे व्याख्यानासह चमत्कार प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी वैज्ञानिक प्रयोगासह व्याख्यान सारीकाताई देहनकर यांनी केले. हसत खेळत विज्ञान समजूया या संकल्पनेतून अनेक प्रयोग विद्यार्थ्यांना सांगितले. प्रयोगांच्या अंतिम टप्प्यात डेहनकर यांनी चमत्कार वाटणाऱ्या प्रात्यक्षिकांमागील कार्यकारण भाव तथा वैज्ञानिक सत्य स्पष्ट केले.

          या प्रयोगात डेहनकर यांनी विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढून त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वर्धिष्णू झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता ढवळे, कार्यक्रमाचे संयोजक कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर सर प्रमुख अतिथी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गेडाम मॅडम,अंगणवाडी सेविका मुन मॅडम उपस्थित होत्या.
         कार्यक्रमाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी प्रा.डॉ. कमल पोटदुखे, प्रा. नरेश पाटील, प्रा. नलिनी भगत, प्रा.विशाखा मानकर व रुपाली फाले, शंकर मंदे, अंकित तेलंग, सारा लोंढे, कोमल छापेकर, समीक्षा पाटील, अस्मिता पाटील, दिव्यांशू गेडाम, साक्षी डूडूरे, आशिष सिराम, आदित्य गायकवाड, निखिल खेडकर, काजल खोंड, मोनिका वर्भे यांनी  सहकार्य केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी व समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराम जाधव, प्रास्ताविक जिल्हा विवेक वाहिनीच्या कार्यवाह प्रा. डॉ. मंजुषा देशमुख तर आभार प्रदर्शन जिल्हा युवा विभागाचे कार्यवाह रोहन आदेवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad