Type Here to Get Search Results !

लायन्स स्कूल येथे ''स्त्री कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न"

वणी : 

      लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित २ ते ८ ऑक्टोबर २०२४ मानवता सेवा सप्ताहा अंतर्गत दि. ०६ ऑक्टोबर रोजी स्त्री कॅन्सर तपासणी व निदान निःशुल्क शिबिराचे आयोजन लायन्स स्कूल देशमुखवाडी येथे करण्यात आले. 

        या शिबिरात १४० स्त्री रुग्णांची तपासणी करण्यात आली व १३ संशयित रुग्ण आढळून आले. नागपूर येथील नार्ची -नागपूर चॅप्टर मेनोपाज सोसायटी, अशोशिएशन ऑफ सर्जन, विदर्भ अशोशिएशन ऑफ पॅथालाजीस्ट अँड मायक्रोबायोलाजिस्ट यांचे सहकार्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यांत २२ डाक्टर, मदतनीस व नर्स तज्ञ चमूने सर्व रुग्णांची बी पी, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन इ. तपासणी करून निदान व मागदर्शन केले.

           शिबिराचे उद्घाटन वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केले. अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे डॉ. श्रीमती निर्मला वझे, प्रोजेक्ट डायरेक्टर लायन सौ. मंजीरी दामले, लायन सौ. विणा खोब्रागडे, क्लबचे सचिव लायन किशन चौधरी, लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन महेन्द्र श्रीवास्तव, लायन सुधीर दामले, लायन पुरुषोत्तम खोब्रागडे, लायन तुषार नगरवाला, लायन प्रमोद देशमुख, लायन सौ. ललीता बोदकुरवार, लायन सौ.सुनीता खुंगर, लायन सौ.खुशी नगरवाला, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे उपस्थित होते. 

     शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात नागपूर व स्थानिक तज्ञ डॉक्टर तसेच मदतनीस व नर्स यांना अतीथींच्या हस्ते सन्मान चिन्ह देउन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सौ मीरा काळे यांनी केले व लायन किशन चौधरी यांनी आभार मानले. लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल च्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad