Type Here to Get Search Results !

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित दाखल केला अर्ज

वणी
     वणी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी दि. २९  ऑक्टोंबर रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते स्थानिक जत्रा मैदान येथे उपस्थित झाले होते. संजय देरकर यांनी रंगनाथ स्वामी मंदिर, भगत सिंग चौक, गांधी चौक, खाती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गक्रमण करीत नागरिकांना अभिवादन करत शासकीय मैदान पाण्याची टाकी येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले.

      यावेळी खासदार संजय देशमुख (यवतमाळ वाशीम), काँग्रेस चे नेते वामनराव कासावार, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय नगराळे, संजय निखाडे, सुनील कातकडे, दीपक कोकास, काँग्रेस च्या अरुणाताई खंडाळकर, महिला जिल्हा संघटिका डीमनताई टोंगे, साधनाताई गौरकार, टिकाराम कोंगरे, घनश्याम पावडे, मारोती गौरकार,आशिष खुलसंगे, राजेश कासावार, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad