Type Here to Get Search Results !

संविधान स्विकारल्या नंतरही स्त्रियांच्या स्थितीत बदल नाही - गजेंद्र सुरकार

प्रतिनिधी/ वर्धा (मंगेश राऊत) : 

                               या जगात मानवी उत्पत्ती नंतर शेतीचा शोध महिलेने लावला त्यामुळे स्त्रिसत्ताक कुटूंब व्यवस्था जगभर निर्माण झाली मात्र महिलांची प्रगती पाहून पुरूष शासंकित व भयभित झाला याचाच परिणाम म्हणजे स्त्रियांवर अनेक बंधने घालून त्यांना कुटूंबात, समाजात दुय्यम स्थान दिले, रूढी परंपरा चालीरीती परंपरा याच्या नावावर बंधने घातली संविधान स्विकारल्या नंतरही महिलांच्या स्थितीत बदल झाला नाही असे मत महाराष्ट्र शासनाच्या यशदा संस्थेचे कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक छळ कायदा २०१३ या विषयाचे तज्ञ प्रशिक्षक, मार्गदर्शक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

     महाराष्ट्र शासनाच्या यशदा या संस्थेच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा (डायट)मार्फत वर्धा जिल्ह्यातील तृतीय श्रेणी कर्मचारी यांचे प्रशिक्षण कार्यशाळा डायटच्या प्रशिक्षण सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी मंचावर संस्थेचे प्राचार्य डॉ मंगेश घोगरे श्रीमती प्रतिभाताई देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

       प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ चे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या यशदा या संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक गजेंद्र सुरकार यांचे मार्गदर्शन घेण्यात आले यावेळी महिलांची कुटूंबात, समाजात असलेली विषमता, त्यांच्यावर होणारे परिणाम,हिंसा, लैंगिक शोषण, अत्याचार,महीलांच्या हक्कासाठी जगात भारतात झालेली आंदोलने,त्यांच्या साठी झालेले विविध कायदे, संविधानात कलम १४ ते२१ कलमा अन्तर्गत महिलांना सम्मानाने जगण्याचा अधिकार,विशाखा कमिटीची मार्गदर्शक तत्वे, विशाखा कमिटीची रचना, लैंगिक छळाची कारणे,विशाखा कमिटीची कार्यकक्षा,कमिटीत असणारे प्रतिनिधी,त्यांचे अधिकार, सर्व्हिस सिविल कोड, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळाचे प्रकार, तक्रार कशी करावी, हा कायदा करण्यामागील कारणमिमांसा आदीवर सखोल प्रशिक्षण यावेळी उपस्थित कर्मचारी यांना देण्यात आले हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या कार्यालयात विशाखा समिती स्थापन करण्यासाठी संबंधीतांना पाठपुरावा करावा व आपल्या कार्यालयात महिलांना सुरक्षित व पोषक आणि सम्मानजनक वातावरणात कार्यालयीन काम करता यावे त्यांना संविधानाने व युनोने बहाल केलेल्या सम्मानाने जगण्याचा हक्क, अधिकार यांचे कुणाकडूनही व कशाही प्रकारे हनन होणार नाही याची दक्षता बाळगून एक सहकारी म्हणून प्रयत्न करावे असे आवाहन केले. 

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक आखाडे, सुत्रसंचालन अंजली कदम यांनी तर आभारप्रदर्शन लता शेंडे यांनी केले प्रशिक्षणाला जिल्हातील विविध सरकारी कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी महिला पुरुष उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad