Type Here to Get Search Results !

समाजसेवक संजय चिंचोलकर यांचा प्रा. कोंगरे व भोयर यांच्याकडून सत्कार

वणी, शुभम कडू :

                           समाजाला शिकवण आणि सामजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले संजय चिंचोलकर (रा. वणी जि. यवतमाळ) यांचा गुरुवारला दि. २६/०९/२४ रोजी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक चे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे व युवा सामाजिक कार्यकर्ते धीरज भोयर यांचे कडून शाल, श्रीफल आणि ग्रामगीता देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
         समाजसेवक संजय चिंचोलकर हे धोबी समाजातच नाही तर इतर समाजात देखील प्रख्यात असून समाजिक कार्यात त्यांचा नावलौकिक आहे.

        भूखे को अन्न (रोटी) दो, प्यासे को पानी पिलाओ, वस्त्रहीन लोगों को वस्त्र दो, गरीब बच्चों की शिक्षा में मदद करो, हर गरीब को शिक्षा देने में योगदान दो, बेघर लोगों को आसरा दो, अंधे, विकलांग, बीमार व्यक्ति की सहायता करो, बेरोजगारों को रोजगार दो, याच संत गाडगे बाबा यांच्या विचारानुसार समाजसेवक संजय चिंचोलकर सामाजिक कार्य करीत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेत प्रा. टीकाराम कोंगरे व धीरज भोयर यांनी सत्कार करून संजय चिंचोलकर यांना सन्मानित केले. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016