Type Here to Get Search Results !

मारेगाव येथे लालबावटा वाहनचालक युनियन नामफलकाचे उद्घाटन

मारेगाव :

             केंद्र सरकारने भारतीय वाहनचालकवर हिट एंड रन या अन्यायी कायदा वाहनचालकांच्या मानगुटीवर बसवला आहे. या कायद्याविरोधात आयटकचे नेत्रुत्वात म.रा.लालबावटा वाहनचालक युनियनची स्थापना करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नरसाळा येथे तालुकास्तरीय वाहनचालकांचा भव्य मेळावा संपन्न झाला. 
         मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शब्बीरखान पठान होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भाकप जिल्हासचिव अनिल घाटे, राज्य कौंसिलर सुनिल गेडाम, आयटक जिल्हासचिव संजय भालेराव,भाकप जिल्हा सहसचिव बंडु गोलर होते. अतिथी म्हणुन किशोर सुरपाम,अनंतराव गोवर्धन,विलास ढुमणे होते. 
              मेळाव्याचे अगोदर वाहनचालकांची रॅली काढुन अनिल घाटे यांचे हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्यात वाहनचालकांना किमान वेतन मिळण्यासाठी संघटितपणे काम करण्याचे ठरविण्यात आले.वाहनचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी वणी विधानसभा मतदारसंघातुन कॉ.अनिल हेपट यांना निवडुन देण्यासाठी तन मन धनाने काम करण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी अनिल हेपट यांचे नेत्रुत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील शेकडो युवकांनी पक्षात प्रवेश घेतला. 

       मेळाव्याचे संचालन किशोर बोढाले, प्रस्तावना लक्ष्मण कनाके यांनी तर आभार प्रदर्शन रामकिशन घुमे यांनी केले. यशस्वितेसाठी महीन्द्रा उईके, श्रिकृष्ण जोगी, श्रिकांत सोमटकर, ज्ञानेश्वर दडांजे, निरंजन तिखट, विजय रायपुरे, स्वप्निल तोडासे, रामकृष्ण जोगी, अच्छुत बोढे,अरूण मडावी, सुनिल राजुरकर, मुन्ना बैस, सतिश कोवे,विष्णु मोहुर्ले, देवानंद बोढे, मनोज अंड्रस्कर, संजय नक्षिणे, रामकिशन घुमे, आेमप्रकाश मिश्रा, गजानन राऊत ई. यांनी अथक प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad