Type Here to Get Search Results !

जे.डी चौधरी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

प्रतिनिधि/कोरा (मंगेश राऊत) : 

                   स्थानिक जे.डी चौधरी कनिष्ठ महाविद्यालय वासी येथे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .हे ध्वजारोहण यावर्षी राशी संजय ओस्तवाल या विद्यार्थ्यांनीला मिळाला ही विद्यार्थिनी वर्ग बारावीतून जिल्ह्यात तिसरी व समुद्रपूर तालुक्यात प्रथम आली होती म्हणून तिच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येत असतो. या कार्यक्रमाला ध्वजारोहण करणारी विद्यार्थिनीचे वडील संजय ओस्तवाल हे सुद्धा उपस्थित होते. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव चौधरी व सचिव सौ. दुर्गा चौधरी यांनी त्या विद्यार्थिनीचा शाल ,श्रीफळ व मोमेंटो देऊन भव्य सत्कार केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्राचार्य प्रणिती चौधरी, प्रा.नितीन डहाके, प्रा. प्रणिता चौधरी, प्रा.तेजस्विनी मानूसमारे, प्रवीण भोयर, निखिल चौधरी, प्रवीण साबळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी भरपूर सहकार्य केले. कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad