प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत) :
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७७ व्या वर्धापण दिन सर्वत्र साजरा होत असताना आणि जय किसान जय जय जवान ,विजय विज्ञान अशी घोषणा मा प्रधानमंत्री यांनी केली असता आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही अज्ञान व गैरसमज पसरविण्याचे सुनियोजित कटकारस्थान काही मंडळी करीत असून भोळे भाबडे लोक याला बळी पडतांना दिसली वर्धा शहरापासून जवळच असलेल्या सालोड हिरापूर येथील शिवमंदिरात गजानन नगर येथील साहू हाॅस्पिटल मागिल मंदीरात कारला रोड परिसरात पाहता पाहता दगडी नंदी पाणी पित असल्याची वार्ता पसरली आणि लोकांनी नंदीला पाणी पाजायला सुरुवात केली . काहीनी त्याला दुजोरा दिला तर काहीनी पाणी पित नसल्याचे सांगितले . ही वार्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार व महाराष्ट्र अनिसच्या कार्यकर्त्यांना रात्री लोकांकडून कळताच गजेंद्र सुरकार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष अरुणभोसले .वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प चे सहकार्यवाह प्रकाश कांबळे , जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले , बुवाबाजी विभागाचे कार्यवाह भरत कोकावर , युवा विभागाचे निखिल सुशीला मोरेश्वर महिला विभागाच्या कार्यवाह व्दारकाताई ईमडवार यांनी सालोड येथे प्रत्यक्ष भेट दिली असता तेथील मंदिराची पाहणी केली आणि उपस्थितांसमोर चमच्यामध्ये पाणी घेऊन चमचा सरळ धरित नंदीच्या तोंडाजवळ नेवून मूर्तीला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण एक थेंब देखील पाणी कमी झाले नाही याउलट जर पाणी भरलेला चमचा तिरपा नंदीच्या मूर्तीजवळ पकडल्यास पाणी नंदीच्या गळ्याच्या बाहेरील भागातून खाली उतरत असल्याचे उपस्थिताना दाखविले आणि उपस्थिताना सुद्धा या पद्धतीने कृती करायला लावून नंदीची मूर्ती पाणी पित नसल्याचे समजावून सांगितले यासोबतच जर चमचा हातात धरून दुध पाणि किंवा कोणताही द्रव स्वरूपात असलेला पदार्थ पाजत असतांना हात थर थरत असेल तर मुर्ती ती पित नसून ति गळ्यापासून खाली सरकते मात्र श्रध्दा व अंधश्रद्धेच्या पायी तिकडे लक्ष जात नाही मात्र अशा प्रकारची अफवा पसरवून अंधश्रधाना बळी न पडण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ग्रामस्थाना तसेच वर्धेकरांना केले आहे हि घटना जादुटोणा विरोधी कायदा अन्तर्गत गुन्हा असून अशा प्रकारचा चमत्कार दाखविल्यास किंवा त्याचा प्रचार प्रसार केल्यास अशा सर्व लोकांवर गुन्हा दाखल होवून सहा महिने ते सात वर्ष सजा व पाच हजार ते पन्नास हजार रूपयापर्यंत दंड होऊ शकतो कोणतीही निर्जीव मुर्ती दुध, पाणी किंवा कोणताही पदार्थ पित नसतो कारण प्रत्येक कारणामागे कार्यकारणभाव असतो मुर्ती पाणी किंवा दुध पिते हि अंधश्रद्धा आहे त्यामुळे अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या तर्फे पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे असेही कळविण्यात आले आहे.



