अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजण मोबाईल परत करतात. आज प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन आहे, मात्र एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक माणसे स्वतःहून मोबाईल परत करत असतात.
VIVO कंपनीचा सापडलेला मोबाईल केला परत
0
वणी :
एखाद्या व्यक्तीला स्क्रीनटच मोबाईल सापडला तर तो खूप खुश होतो. परंतु त्यांनी मोबाईल सापडल्यानंतर, हा मोबाईल कोणाचा हरवला असेल, तो माणूस किती नाराज असेल असा विचार करत आज सकाळी किसन कडू यांनी सापडलेला मोबाईलची चौकशी केली असता मोबाईल हा कनकवाडी परिसरातील नरेंद्र पोटे यांचा असल्याचे समजले. यावेळी किसन कडू यांनी आज दि. २५ मे ला संबंधित मोबाईलच्या मूळ मालकाला त्यांचा हरवलेला मोबाईल परत दिला. यावेळी नरेंद्र पोटे यांनी मोबाईल परत केल्यानंतर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले. असा प्रामाणिकपणा आजकाल क्वचितच पाहावयास मिळत आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या