Type Here to Get Search Results !

युद्ध नको, आम्हा बुद्ध हवे... समुद्रपुर नगरीत माझ्या बा भीमाला आणि गौतमाला अश्या बहारदार गाण्याने श्रोते मंत्रमुग्ध

प्रतिनिधी/समुद्रपुर (मंगेश राऊत) : 
                             समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या २५८६ व्या जयंती प्रित्यर्थ बहारदार बुद्धगीतांनी संगीतमय मानवंदना बुद्ध पहाट गुरुवार, दि. २३ मे २०२४ ला वेळ पहाटे ४.४५ वाजता आयोजित केली होती.
            त्या "बुद्ध पहाट" कार्यक्रमातून गीतांची मेजवानी श्रोत्यांना देण्यात आली होती. वैशाख पौर्णिमानिमित्त्य गुरुवारी पहाटे  पंचशील ध्वज, भालकर वार्ड नं. ६. पानेकर ले-आऊट, समुद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमातून गितांची मेजवाणी मिळाली.
     कार्यक्रमात गितगायन सादरकर्ता रजनीगंधा बुद्ध-भीम गीतमाला संच, कळंब जि. यवतमाळ चे सुप्रसिद्ध गायक वासुदेव दाबेकर, सुप्रसिद्ध गायिका निशा थोरात, सलील कांबळे त्या सोबत  १३वर्षाच्या संघर्ष गौतम मोरे मु. बुधकुडा  ता. जिवती या सर्वांनी  बुद्ध, भीम गीते सादर केली.
 या कार्यक्रमांमध्ये गायक कलाकारांनी माझ्या बा भीमाला आणि गौतमाला , अरे बिकने वाला टिकता नहीं मेरे भीम के दरबार में, अमृत वाणी ही बुद्धाची, नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा, इत्यादी गीते सादर केली. 
   कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळांच्या कडकडाटाने परिसर दुमदुमून गेला होता. गायकांच्या आवाहनानुसार श्रोत्यांनी सोबत गायन सुद्धा केले. 
           कार्यक्रमास डॉ. बी . आर आंबेडकर ज्यू. कॉलेज हिंगणघाट चे संस्था अध्यक्ष श्री. अनिल जवादे सर त्या सोबत वार्ड नगर परिषद समुद्रपुर चे वार्ड नंबर ८ चे नगर सेवक अमित भाऊ वासनिक, महाकाळे सर, ठाकरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
     त्यांचा  समितीच्या सदस्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यासोबतच शासकीय नोकरीस पात्र ठरलेल्याचा पण सत्कार  करण्यात आला.
 कार्यक्रमात सूत्रसंचालन डॉ. सोनम मेंढे व सलील कांबळे यांनी केले त्या सोबत त्यांनी  श्रोत्यांना शायरीतून मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मिलिद मैस्हके यांनी केले.
              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक संकल्प फाऊंडेशन, समुद्रपूर व रमाई महिला मंडळ, समुद्रपूर च्या सर्व सदस्य मंडळीनी मेहनत घेतली आणि आयोजन केले.
         समुद्रपुर बुद्ध पोर्णिमेनिमीत्त आयोजित कार्यक्रमात गीतकारांनी गायलेल्या गीतांना नागरिकांनी साद घातली. अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसर दणाणून गेला होता आणि कार्यक्रम हा छायाचित्रकार प्रतिक गणविर यांच्या YouTube channel च्या माध्यमातून नागरिकांसाठी लाईव्ह करण्यात आला होता.
              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचशील युवा मंच, समुद्रपूर.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, समुद्रपूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, समुद्रपूर सामाजिक विचार मंच, समद्रपूर व बुद्ध पहाट मित्र परिवार, समुद्रपूर च्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016