वणी : तालुक्यातील वांजरी गावातील शेतकरी किशोर लडके यांच्याकडे तीनचाकी ऑटो असून शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करतात. किशोर लडके यांना एक मुलगा ओमकार आणि एक मुलगी आहे. शुक्रवारी दि. १७ ला दु. ०४:३० वाजेपर्यंत ओमकार हा गावात फिरत होता. मात्र सायं. ०५:०० वाजताच्या दरम्यान ओमकार घरी गेला व सरळ दुसऱ्या मजल्यावर खोलीत जाऊन पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. वणीतील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.


