Type Here to Get Search Results !

घोन्सा-वणी रोड वर चोरट्यांची वाहन अडवून चालकाला मारहाण करून लुटले

 

वणी :     शहरातील व्यावसायिक राजेश तारुणा यांचे वाहेगुरू किराणा भंडार दुकान असून ग्रामीण भागात लहान दुकानदारांना किराणा माल पुरवत असतात, गुरुवारी दि. १७ मे ला त्यांचे ऑपे नावाचे तीन चाकी वाहनात किराणामाल भरून ड्रायवर जितेंद्र इंगळे हे घोंसा, रासा, दहेगाव येथे गेले होते. त्याच्या सोबतीला लक्ष्मण मेश्राम हे होते.

         त्यांनी किराणामाल पोहोचवून व जुनी वसुली घेऊन वणीला परत येताना कोरंबी- मारेगाव या रस्त्यावर जनता शाळेच्या पुढे दोन दुचाकी वर आलेल्या चौघांनी यांचा ऑटो अडवून लक्ष्मण मेश्राम याला मारहाण केली. जितेंद्र इंगोले यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांनाही मारहाण करून त्यांच्याजवळील पैशाची बॅग व लक्ष्मण यांचा मोबाईल घेऊन दुचाकी वर बसून चोरटे पळून गेले.          

          या झालेल्या घटनेची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये किराणा मालाची वसुलीचे ८० हजार ७०० रुपये व ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल असे एकूण ८८,७०० ची लूट झाल्याचे गुन्ह्यात नोंद करण्यात आले आहे. वणी पोलिसांनी ३० ते ३२ वयोगटातील चार अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी करीत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016