Type Here to Get Search Results !

वणीतील चौकीदाराचा खुनाचा मारेकऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वणी, शुभम कडू :  

                        शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसोनी परिसरात दि. २८ एप्रिल रोजी झालेल्या चौकीदार हत्या प्रकरणाचा वणी पोलिसांनी छडा लावला असून चौकीदारचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या घटनेनंतर परिसरात  मर्डर मिस्ट्रीची वार्ता चांगलीच पसरल्याने  आरोपीना  अटक कधी होणार हे पोलिसांसमोर आव्हान  होते. आरोपीने  शिताफीने हे कृत्य केल्याचे  तपास कार्यात अडथळा  निर्माण होत होता. त्यामुळे पोलिसांना आरोपीबाबत कोणताही क्लू मिळत नव्हता. घटनेच्या तब्बल १८ दिवसानंतर पोलिसांना यश मिळाले आणि आरोपी अजीम शाह रमजान शाह (३५) रा. कलंदरी मस्जिद जवळ कारंजा (लाड) यास बेड्या ठोकल्या.

              वणी यवतमाळ मार्गावर पळसोनी फाट्याजवळ योगेश ट्रेडर्स यांचे सिमेंट गोदामावरती चौकीदाराचे दि.२८ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने खून करून लोखंडी सळईचे ४ बंडल चोरले होते. चोरी व खून प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी वणी, मारेगाव, मुकुटबन नांदेपेरा रोड इत्यादी रस्त्याचे शेकडो सीसीटिव्ही फुटेज तपासले. स्वतः उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे तपासात गुंतले होते. पोलीस अधीक्षकांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली होती .

                  पोलिसांसाठी आवाहन ठरलेल्या या ब्लाइंड मर्डर केसचा घटनेच्या १८ दिवसानंतर उलगडा झाला. आरोपी अजीम शाह रमजान शाह याचा भंगार व जुने टायर खरेदी विक्रीचा धंदा असून त्याने टायर चोरी करणे हा प्रमुख उद्देश  होता .त्याने पळसोनी परीसराततील टायर वर डल्ला मारण्याच्या उद्देशाने आला असता त्याचा नजरेस लोखंडी सलाखी नजरेस पडल्या आरोपीच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने त्याला मोह आवरला नाही .टायर चोरीनंतर आरोपीने लोखंडी सलाखी चोरण्याचा  बेत आखला. दि. २८ एप्रिल रोजी  गोदामाबाहेर लोखंडी सलाख चोरत असताना चौकीदार जीवन विठ्ठल झाडे याला जाग आली व त्यांनी चोरट्याचा विरोध केला. यामुळे आरोपीने चौकिदाराच्या डोक्यावर व पोटावर लोखंडी रॉडने प्रहार करून जिवानिशी ठार केले. ज्या रॉडने ठार केले त्या  सलाखीमुळे  च शोधकार्यात पोलिसांना मदत झाली, असे गोपनीय सूत्रांकडून  सांगण्यात आले .

               सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक यवतमाळ पवन बनसोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी वणी,l गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि बलराम झाडोकार, धिरज गुल्हाणे, सुदाम आसोरे, अश्विनी रायबोले, रामेश्वर कांडुरे, पोहेकॉ सुहास मंदावार, विकास घडसे, विजय वानखडे, सुधीर पांडे, योगेश डगवार, पोना/पंकज उंबरकर, अमोल अन्नेरवार, अविनाश बानकर, निलेश निमकर, पोकों/शाम राठोड, विशाल गेडाम, मोहमंद वसीम, रितेश भोयर, अमोल नुन्नेलवार, संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर यांनी केली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016