Type Here to Get Search Results !

विदर्भाला गारपिटीचा इशारा, येलो अलर्ट जारी

            भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दि. १८ मे शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात  ४० ते ५० ताशी च्या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काही भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी पिकांची तसेच फळबागांची काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय.

          अकोला, अमरावती, यवतमाळ, सोलापूर, सांगली, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांमध्ये शनिवार आणि रविवार दोन दिवस तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपीट देखील होऊ शकते. या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image