वणी, शुभम कडू :
वणी विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून वीज वाहतूक करणारे मोठमोठे टॉवर्स उभे करण्यात आले. या टॉवरच्या मोबदल्यात त्या ठिकाणी जागेच्या किमतीनुसार शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देणे क्रमप्राप्त होते. मात्र सदर कंपन्यांनी या कास्तकारांच्या जमिनी अत्यल्प दरात हडपवून या ठिकाणी हे टॉवर्स उभे केलेले आहेत. याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सर्व आशयाचे निवेदन वणी उपविभागीय अधिकारी यांना आज (दिनांक २७ मे) तहसिलदारांमार्फत देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विभाग याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा या आथिर्क नुकसानीवर दुर्लक्ष करत आहे, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी आवाज उठविल्यास त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याची ताकीद प्रशासना मार्फत देण्यात येत होती. केवळ जमिनी हडपून त्या ठिकाणी मोठमोठे टॉवर्स उभे केले यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व प्रकाराला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. सदर कंपन्यांशी मिलीभगत करत प्रशासनाने ह्या जमिनी अधीग्रहन करुन त्यांना अत्यल्प मोबदला दिला. असा आरोप मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी केला आहे.
सदर कंपन्यांनी आपले कामे आटोपून विभागातून पळ काढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता उर्वरीत रक्कम कुणाकडे मागायची त्यामुळे या प्रकारात उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून त्या सर्व कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीचे योग्य ते मोबदले मिळवून द्यावे, अन्यथा आपण या कंपन्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करीत असल्याचे समजून महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या १ जून २०२४ पासून उपविभागीय कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा उंबरकर यांनी दिला.
यावेळी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे, अजिद शेख, गुड्डू वैद्य, मयूर गेडाम, इरफान सिद्दीकी, लक्की सोमकुंवर, रणजित बोंडे, शम्स सिद्दीकी, उमर शरीफ,युनूस सैय्यद, वैभव पुराणकर, हिमांशू बोहरा, शेहबाज खान, साई आंदलवार, आयाज खान, शिवा शर्मा, नोमान शेख, रोहन वरारकर, रूचिर वैद्य, सारंग चिंचोलकर, संतोष लक्षशेट्टीवार, रोहन पारखी, संस्कार तेलतुंबडे, पराग निमसटकर, आदित्य आलंबलवार यांच्या सह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या