Type Here to Get Search Results !

आर्या इंटरनॅशनल स्कुल मुकूटबनचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत अव्वल

 तालुक्यातील प्रथम येण्याचा बहुमान राखण्यात शाळेला यश

                              ज्ञानदा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था मुकुटबन द्वारा संचालित आर्या इंटरनॅशनल स्कुल मुकूटबन  आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत संस्थेचे पुन्हा एकदा नावलौकिक केले.

       उज्वल यशाची परंपरा परत एकदा कायम

       दी. २७ मे २०२४  रोजी जाहीर दहाविचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान कायम राखण्यात शाळेला यश प्राप्त झाले. यात तालुक्यातील प्रथम श्वेता संतोष देवढगले हिने ९३.२०% तर द्वितीय मिसबा जावेद सैय्यद ९२.८०% तर तृतीय रेहान अमजद शेख ९२.६०% तनिष्का अशोक बरपटवार ९२.००% रितेश जगदीश बाजन्लावार ९१.२०%धृप पवन राऊत ९०.८०% अनुष्का सुभाष भगत ८९.६०% इ विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण प्राप्त केले. आर्या स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षी प्रमाणे यशाची परंपरा कायम ठेवण्यात व तालुक्यातुन प्रथम येण्याच्या बहुमानात अग्रेसर राहिली.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना दिले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad