Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे एक दिवसीय निःशुल्क वैज्ञानिक जाणिवा विज्ञान बोध शिबिर

वर्धा/प्रतिनिधी (मंगेश राऊत) : 

                                               तरूण वयात येणा-या प्रत्येक मुला मुलींमध्ये वैज्ञानिक जाणिवा रूजविण्यासाठी, विज्ञाना विषयी जिज्ञासा निर्माण करण्यासाठी यातून विवेक समाजमन घडविण्यासाठी या वयातच संस्कार होणे गरजेचे आहे तेव्हाच प्रत्येक भारतीय नागरिक विवेकाने विचार करून तो अंगिकारून देश घडविण्यास मदत करू शकतो व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व थोर वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच, व्यक्तीमत्व विकास घडवाण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा आणि नई तालीम सेवाग्राम आश्रम व्दारा संयुक्त विद्यमाने किशोर वयीन युवा युवतीसांठी एक दिवसीय निःशुल्क शिबिराचे आयोजन आनंद निकेतन नई तालीम, सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे रविवार दिनांक १२ में २०२४ वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशाताई बोथरा यांच्या - हस्ते होईल तर न ई तालीमचे मंत्री डॉ प्रभाकर पुसदकर प्रमुख पाहुणे म्हणून सेवाग्राम आश्रमचे मंत्री मा विजय तांबे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील शिबिरार्थीनी घरून जेवणाचा डब्बा आणने आवश्यक असून नाष्टा व थंड पेय निःशुल्क आयोजकातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल.

          शिबिरात काय शिकायला मिळेल, चमत्कार करणे शिकणे, कच-यातून विविध आकर्षक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण वक्तृत्व कला, गाणि खेळ धमाल मस्ती, पक्षी निरीक्षण, गांधी आश्रमाची सहल, गांधींच्या सर्वधर्म प्रार्थनेत सहभाग , गटचर्चा, वैज्ञानिक दृष्टिकोन कसा स्विकारावा, विषारी बिनविषारी सापांची माहिती असे अजून बरेच काही शिकायला मिळेल या निःशुल्क असणा-या शिबिरात आपल्या किशोर वयीन मुला मुलींना पाठवावे असे आवाहन गजेंद्र सुरकार डॉ प्रभाकर पुसदकर, बाबाराव किटे, यशवंत झाडे, दिलीप उटाणे अरूण कुमार हर्षबोधी अरूण चवडे, प्रकाश कांबळे अरूण भोसले निखिल जवादे सारिका डेहनकर डॉ माधुरी झाडे डॉ मंजुषा देशमुख सुनिल ढाले, व्दारकाताई ईमडवार, भरत कोकावार, अनिल मुरडिव राजेंद्र ढोबळे, सुधाकर मिसाळ कविता राठोड कविता लोहट प्रतीभा ठाकूर पंकजा गादेवार नलिनीताई धावंजेवार मैथिली मुळे मिनाक्षि गिरडकर डॉ हरिश पेटकर, संजय भगत, ममता बालपांडे आदींनी केले आहे. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016