वणी, शुभम कडू :
येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच झरी तालुक्यातील मुकुटबन, मांगली, मारकी, अर्धवन व इतर गावातील अनेक युवकांनी राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. अनेक राजकिय उलथापालत व्हायला सुरूवात झाली असून नागरिकांचा मनसेकडे वाढत असलेला ओघ आगामी काळात संघटन मजबुतीचा पाया भक्कम करणारा आहे. विविध सामाजिक उपक्रमात मनसेची असलेली आघाडी आणि पक्षनेते राजु उंबरकर यांच्या लोकप्रियतेने अनेक युवक मनसेत दाखल होत आहेत. झरी तालुक्यात असंख्य युवकांनी राज ठाकरे यांच्या कार्याला प्रभावित होऊन उंबरकर यांच्या उपस्थितीत मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला.
सध्याचे राजकारण पाहता मनसेत हा एक भक्कम पक्ष आहे. त्यामुळे मनसेत येण्याचा निर्णय घेतला. यापुढे आता मनसेचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कार्य करणार असल्याच्या भावना सर्व युवकांनी व्यक्त केल्या.
पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेची ध्येय धोरणे आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम निश्चितपणे करतील असा विश्वास उंबरकर यांनी व्यक्त केला. प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संतोषभाऊ रोगे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. अर्चनाताई बोदाडकर, झरी तालुकाध्यक्ष गजानन मिलमिले , वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे, विलन बोदाडकर, मारेगाव महिला सेना तालुकाध्यक्ष उज्वला चंदनखेडे, मुस्ताक सय्यद, जगदीश गोरलेवार, काशिनाथ कुमरे, उदय खिरटकर,रोशन शिंदे, वैभव पुरानकर यांच्यासह युवक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या