Type Here to Get Search Results !

लायन्स हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात डॉ आंबेडकर यांची जयंती साजरी

वणी, शुभम कडू : 

                         येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात महामानव, भारतरत्न प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत गोडे व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दिपासिह परिहार यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका संध्या बेडदेवार, मनिषा कापसे, जेष्ठ शिक्षक राजु पाटील उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थी स्मिरल डहाके,राणी भालेराव,यश तिवारी, वेदान्त कनाके, देवयानी आसुटकर,गोजीरी मासीरकर,शरयु बलकी,व भार्गव मासीरकर यांनी डॉ बाबासाहेबांच्या जीवन चारित्र्यावर भाषणे दिली तसेच प्राचार्य प्रशांत गोडे यांनी डॉ बाबासाहेबांच्या जीवन व कार्याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्य व स्वयम पथाडे यांनी केले तर ईशीता खराटे हिने आभार मानले. कार्यक्रमाला पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad