प्रतिनिधि/वर्धा (मंगेश राऊत) :
स्थानिक सिंदी (मेघे)येथील बुध्दा टेकडीवर ज्ञानाचे अथांग महासागर महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जंयती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा आंबेडकरी विचारवंत सुप्रिया जंगले होत्या .तर अतीथी म्हणून डाॕ.प्रिया कदम,अॕड ज्योती बनकर,सुनंदा कांबळे,रूपाली वाणी,प्रवीण कांबळे,डाॕ.शैलेश कदम,प्रणोज बनकर,दिनेश वाणी,प्रवीण जंगले,निखिल सुशीला मोरेश्वर,किशोर मस्के,संजय मोडक उपस्थित होते .बुध्द वंदना राजूभाऊ थुल यांनी संचालन सुनील ढाले यांनी प्रास्तविक अॕड ज्योती बनकर यानी,गीत संजय मोडक यांनी तर आभार दिनेश वाणी यांनी मानले .यशस्वीसाठी तनु व-हाडे,साची,वाणी,शाश्वत जंगले ,अनुष्का कांबळे,रियान वाणी इ.परिश्रम घेतले.सर्वांनीच महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला.समारोप मिठाई वाटून व धम्मपालन गाथेने करण्यात आली.


