Type Here to Get Search Results !

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी/समुद्रपुर (मंगेश राऊत) : 

                    उसेगाव (कोरा) - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ साव्या जयंती महोत्सवानिमित्त त्रीरत्न बौद्ध उपासक मंडळ उसेगाव येथे भीम जयंती च्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

           कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री विलास तीमांडे  उसेगाव ग्रामपंचायत, श्री भास्कर गुडधे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसेगाव, श्री. आशिष तलांडे, सौ. मंगला तिमांडे, सौ. सुनीता तलांडे, ग्रा. पंचायत सदस्य उसेगाव , श्री. जयंत राऊत उपरपंच पारडी, श्री.विजय बारेकर  गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक चापापुर, तसेच गावातील बौद्ध उपासक आणि उपासिका त्या सोबत गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून ध्वजारोहन करण्यात आले. पंचशील ध्वजारोहण  गावचे सरपंच श्री. विलासराव तीमांडे , मुख्याध्यापक श्री. भास्करराव गुडधे , श्री. भारतराव राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

       त्यानंतर बुद्ध वंदना त्रीशरण पंचशील घेण्यात आले.  उपस्थीत मान्यवरांनी महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यासोबत विहान राऊत आणि यश वरघणे यांनी भिमगर्जना दिली सोबत उपासिकानी व गावचे सचिन चंदणखेडे यांनी भीम गीत गायन केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संध्या लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी नंदिनी राऊत यांनी केले कार्यक्रमाला बौद्ध उपासक तसेच उपासीका त्या सोबत गावातील समस्त नागरी उपस्थीत होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad