समुद्रपुर/ प्रतिनिधी (मंगेश राऊत) :
कोरा - राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सिद्धार्थ युवा मंडळ व रमाई महिला मंडळ कोरा यांनी प्रबोधना कार्यक्रमचे आयोजन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मा मुंजेवार सिद्धार्थ युवा मंडळ अध्यक्ष, उद्घाटनीयस्थानी सौ. वैशाली लोखंडे सरपंच ग्रामपंचायत कोरा, तसेच श्री संजय सरपाते उपसरपंच ग्रामपंचायत कोरा,प्रमुख पाहुणे डॉ.समीर मुरतकर वैद्यकीय अधिकारी कोरा ,मा. अरविंद येवले पत्रकार कोरा, श्री राजू खनंग, श्री मंगेश राऊत, सौ वर्षा लाडे रमाबाई महिला मंडळ अध्यक्ष मंचकावर उपस्थित होते.
महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजा करून उद्घाटनिय कार्यक्रमाला सुरुवात झाली. कुमारी योगिता डक हिने स्वागत गीत व धम्म गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली.
सौ. वैशाली लोखंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा त्यांनी आपल्या प्रास्ताविकेमधून केली. मंगेश राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या शिक्षण विषयाची कास धरून आपल्या कोऱ्या गावात एका भव्य दिव्य ग्रंथालयाची अत्यंत आवश्यकता आहे व ती या कार्यक्रमाचे अनुषंगाने प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत कोऱ्या गावात लवकरात लवकर ग्रंथालय स्थापन व्हावी असे मत व्यक्त केले. श्री राजू खनंग यांनी आपल्या भाषणामध्ये संविधानाबद्दल आज आपला देश ज्या संविधानावर उभा आहे ते संविधान पुस्तक नसून एक ज्ञानाचा महासागर आहे ते प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे असे विचार व्यक्त केले. डॉक्टर समीर मुरतकर यांनी आपले विचार व्यक्त करताना असे कार्यक्रम नेहमी होत राहावे जेणेकरून जी छोटी मंडळी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला महात्म्यांचे महत्त्व विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतात व त्यामुळे त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते व आपल्याला पुढे काय करायचे आहे हे ध्येय इथे निश्चित करू शकतात. त्याचप्रमाणे समाजभवनामध्ये जर ग्रंथालयाची स्थापना केली तर वेगळं ग्रंथालय करायची गरज नाही जागा उपलब्ध आहे आणि तिथे मोठे ग्रंथालय होऊन ते सर्वांच्या सोयीचे होईल असे विचार व्यक्त केले. श्री अरविंद येवले यांनी इतिहासकालीन परिस्थिती व आजच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या महामानवांनी शिक्षणाला महत्त्व देऊन शाळा स्थापन केल्या व गोरगरिबांना सर्वांना समान शिक्षण मिळण्यासाठी शाळा उभारल्या या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने गावागावात जिल्हा परिषद शाळा सुरू केल्या परंतु आजची परिस्थिती बघता जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे शडयंत्र सुरू आहे.कित्तेक शाळेला शिक्षकच नाही.आणि असेच जर सुरू राहले तर पुर्वीच्या काळातील परिस्थिती पुन्हा आपल्या नवीन पिढीसमोर आल्याशिवाय राहणार नाही आणि पुढची पीढी पुन्हा शिक्षणापासून वंचित राहील.याचा आजच विचार करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण धम्मा मुंजेवार यांनी जयंतीच्या माध्यमातून महामानवांना पुन्हा स्मरण केले जाते. आम्ही असे कार्यक्रम सतत करत राहू व आम्ही महामानवांचे विचार कार्यक्रमाच्या माध्यमातून सदैव जिवंत ठेव असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर शंभरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन साहिल लोखंडे यांनी केले. लहान चिमुकल्यांनी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक उपासिका, गावातील जेष्ठ मंडळी, महिला मंडळी, बालगोपाल, सिद्धार्थ युवा मंडळाचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते तसेच रमाबाई महिला मंडळाच्या सर्व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या