समुद्रपुर/प्रतिनिधी (मंगेश राऊत):
कोरा- नव्याने होत असलेल्या राज्य महामार्गावर मुरमाऐवजी लाल मातीचा वापर केला जात असून थोड्या पावसामुळेही रोडला लाल चिखलाचे रौद्ररूप प्राप्त झाले व अनेक प्रवाशांचे अपघात झाले व होत आहेत याचे ठेकेदाराला, अभियंत्याला, अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना काही घेणे देणे नाही असे दिसून येत आहे.
हिंगणघाट चिमूर राज्य महामार्गाचे अनेक महीण्यापासून काम सुरू आहे मात्र अनेक ठिकाणी ठेकेदारांच्या गलथानकामामुळे कोरा नंदोरी रोडवर गड्डे पडले त्याचप्रमाणे कोरा ते खडसंगी रोडचे काम सुरू आहे मात्र रोडवर मुरमा एवजी लाल माती टाकण्यात आली आणि रोडवर सगळीकडे लाल चिखल तयार झाले दोन दिवसापासून पाऊस सुरू असलेल्यामुळे आज सकाळपासून शेतकरी वर्ग शेतात जाण्याकरिता निघाले असता दुचाकी गाड्या जाऊ शकत नव्हत्या तर चिमूर कडून येणारी मालवाहु गाडी रोडवरच फसली त्याचप्रमाणे चिमूर अमरावती बस चिखल्यामुळे रोडवर थांबली या बस मध्ये सेवाग्रामला दवाखान्यात जाणारे रुग्ण होते तर समुद्रपूरला बी.एसी परीक्षेचे पेपर देण्या करिता जाणारे प्रवासी होते तर अनेक प्रवासी वर्धा अमरावतीला जाणारे होते त्याचप्रमाणे त्या पाठोपाठ चिमूर वर्धा बस होती त्यामागे कापूस भरलेल्या दोन मालवाहतूक उभ्या होत्या तर दुसऱ्या बाजूला एक महालवाहु ट्रक लालामातीच्या चीखलामुळे फसला होता त्याच पाठोपाठ हिंगणघाट चिमूर बस होती त्याचप्रमाणे हिंगणघाट ब्रह्मपुरी बस होती त्यामधे चीमुर ,कानपा, ब्रह्मपुरी चे हिंगणघाट वरून बसलेले प्रवासी होते. दुचाकीचा तर विचारच नको.
आज कोरा येथे आठवडी बाजार असल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी वर्ग शेतातून शेतमाल आठवडी बाजारात विकण्या करिता आणतात मात्र आज त्यांचा भाजीपाला , शेतमाल बाजारात येणे शक्य नाही रोडमुळे आज शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी कोरा येथील बाबूलाल लोखंडे यांचा मोठा अपघात झाला होता या सर्व बाबींना जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.
या रोडच्या कामामुळे मात्र ठेकेदार मस्त अभियंते, अधिकारी सुस्त प्रवाशांचे अपघात हाल बेहाल होताना दिसत आहे. होत असलेल्या अपघातांवर ठेकेदार व अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असे बाब जनता विचारात आहे.
टेस्टिंग लॅबमधून मुरमाचे परीक्षण केल्यानंतरच आम्ही इथे लाल मुरूम टाकला असे ठेकेदाराची माणसं बोलत आहे.
"लवकरात लवकर जर या रोडवरील लाल माती उचलण्यात आली नाही तर आम्ही कोरा चिमूर रोडवर चक्काजाम आंदोलन करू व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील."
- एक त्रस्त शेतकरी कोरा.






टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या