Type Here to Get Search Results !

मतदानासाठी कामगारांना २६ एप्रिल रोजी पगारी सुट्टी

वर्धा/प्रतिनिधि (मंगेश राऊत) : 

                                 वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी दि. २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघातील सर्व कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि. ५ एप्रिल २०२४ शासन निर्णयानुसार मतदानासाठी कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

निवडणुकीच्या दिवशी कोणत्याही परिस्थीतीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भर पगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना भर पगारी सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी कारखाने मालकाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची पूर्व परवागनी घेणे आवश्यक आहे. 

सदर आदेश उद्योग, उर्जा, कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स ईत्यादींचा समावेश आहे.

उद्योग, उर्जा, कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदानासाठी सुट्टी किंवा पुर्व परवानगीने सवलत न दिल्यास आस्थापना धारकांविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे सरकारी कामगार अधिकारी कौ. ज. भगत यांनी कळविले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad