प्रतिनिधि/कोरा (मंगेश राऊत) :
विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरा च्या वतीने दिनांक २२/०४/२०२४ रोज सोमवारला लोकसभा निवडणूक २०२४ मतदान जनजागृती च्या अनुषंगाने स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय कोरा येथे वर्ग ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती या विषयावर विविध रांगोळ्या काढून जनतेत रांगोळीच्या माध्यमातून मतदानाची जागृती केली यात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या या स्पर्धेचे परीक्षक श्री गिरधर काचोळे सरांनी केले या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रांगोळी राकेश नन्नावरे यांनी काढली त्याला प्रथम बक्षीस ग्रामपंचायत सरपंच सौ वैशालीताई लोखंडे मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रमास प्राचार्य सुमेध भालशंकर साहेब, सौ वैशालीताई लोखंडे मॅडम (सरपंच),संजय सरपाते (उपसरपंच ),ग्रामपंचायत सदस्य शिरीष भाऊ पंढरे, मनोज बारस्कर, बाबुलाल डफ, शुभम भगत, गणेश वैरागडे, सौ घोडे ताई ,सौ वैरागडे ताई , सौ ननावरे ताई, सुभाष भोयर, विलास तांबे ,संदीप भगत ,तसेच गुलाबराव चिंचोलकर वार्ताहर श्री अरविंद येवले, प्रवीण पंढरे उपस्थित होते .विकास विद्यालय कोराचे शिक्षक वृंद श्री गिरधर काचोळे सर, श्री प्रशांत तिखट सर, श्री अक्षय सालवटकर सर, श्री राजेंद्र कामटकर सर, श्री नामदेवराव नवघरे सर, कु. जयश्री नागोसे मॅडम, सौरभ वैरागडे सर ,राणी सावसाकडे मॅडम ,रूपाली महाजन मॅडम, कु. प्रतीक्षा बारस्कर मॅडम, कु.मंजुषा कुडमेथे मॅडम, उच्च माध्यमिक विभागातून प्रा. गजानन शेंडे सर ,प्रा. अमोल काकडे सर, प्रा.रितेश भुजाडे सर, प्रा. शिंदे सर, श्री कमलेश काकडे सर, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यातून श्री सतीश बोकडे ,श्री प्रमोद लडी, श्री धीरज पेंदाम तसेच कोरा गावातील ग्रामवासी उपस्थित होते. अशा प्रकारे मतदान जनजागृती कार्यक्रम रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय शांततेत पार पडला.


