Type Here to Get Search Results !

मनसेच्या दणक्याने शेतकऱ्यांना मिळाला पीक विमा

वणी/प्रतिनिधी :  विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व अन्य नैसर्गिक कारणांमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.  राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला होता. वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला. या अवकाळी पावसामुळं  नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी या पिकांचा पिक विमा काढला होता. 
या नुकसानीला अनेक महिने उलटले तरी पीक विमा कंपन्यांकडून सर्व्हेक्षण व नुकसान भरपाई मिळाली नव्हती. तर याबद्दल शेतकऱ्यांनी विचारणा केल्यास कंपन्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन याकडे कानाडोळा करत होते. शेतकऱ्यांना तात्काळ प्रधानमंत्री पीक विमा मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी निवेदन देऊन पाठवपुरवा केला होता. परंतु यावर पिक विमा कंपन्यांकडून कुठलीही कार्यवाही न झाल्याने आज अखेरीस वणी मतदारसंघातील असंख्य शेतकऱ्यांनी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांची भेट घेऊन ही मदत मिळवून देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत सर्व शेतकऱ्यांसमवेत गोहोकार यांनी पिक विमा कंपनीचे कार्यालय गाठले आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तात्काळ दाखल घेतली आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरूवात झाली आहे तर उर्वरित शेतकऱ्यांना उद्यापासून पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे तालुकाध्यक्ष गोहोकर यांनी सांगितले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad