Type Here to Get Search Results !

स्माईल फाउंडेशनकडून विद्यार्थांना मोफत पुस्तके वाटप

वणी : स्माईल फाउंडेशन ही संस्था विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. याचाच एक भाग म्हणून जेईई, नीट, सीईटी आदी परीक्षार्थ्यांना उपयुक्त पुस्तकांचे वितरण स्माईल फाउंडेशनने केले. यासाठी प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर किरण दिकुंडवार यांनी ही जबाबदारी उचलली. त्यांनी स्वखर्चाने ही सर्व पुस्तकं उपलब्ध करून दिलीत. पुस्तक वितरणाचा सोहळा एस.पी.एम. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण दिकुंडवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्माईल फाउंडेशनचे आभार मानले. 

          या सोहळ्यात जवळपास २० निवडक विद्यार्थ्यांना जवळपास ३१ हजार रूपयांची पुस्तके वर्षभराकरिता वितरीत झालीत. त्यानंतर ही पुस्तके नवीन विद्याथ्यांना दिली जातील. किरण दिकुंडवार हे नेहमीच स्माईल फाउंडेशनला विविध स्वरूपांत सहकार्य करत असतात. भविष्यातही विविध उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांच्याच सहकार्यामुळं हा छोटेखानी सोहळा उत्साहात झाला. 

   विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ही पुस्तके खरेदी करण्याची क्षमता नाही, अशांना यात प्राधान्य देण्यात आलं. स्माईल फाउंडेशनची स्वतःची बूक बँक आहे. या योजनेअंतर्गत पुस्तकांची देवाण घेवाण होते. गरजूंना कपडे वाटप, पुस्तक वाटप, सायकल वाटप, ज्येष्ठांना काठी बाटप असे संस्थेचे उपक्रम सुरूच असतात. संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी जी मदत करता येईल ती करण्याची विनंती केली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल आत्राम, आदर्श दाळे, गौरब कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतलेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad