Type Here to Get Search Results !

लायन्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती साजरी

वणी : येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार व शाळेचे अध्यक्ष श्री .संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते छत्रपती शिवराय व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शिवजयंती कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार, अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य प्रशांत गोडे, पर्यवेक्षिका मनिषा कापसे, जेष्ठ शिक्षक राजु पाटील, मीरा काळे व चित्रा देशपांडे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी  बाळ शिवाजीचा पाळणा,एकच राजा इथे जन्मला,राजं आलं राजं, इत्यादी समुह नृत्ये सादर केली.शिवकालीन ढोल-पथक, लाठीकाठी चे रोमांचकारी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला तसेच उत्स्फूर्त भाषणे दिली . शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत भूमिका सादर केल्या छ.शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणून आपल्या द्रष्टा कार्य ची अमीट मुद्रा मानवी इतिहासावर उमटविली असे मनोगत पाहुण्यांनी व्यक्त केले."गर्जा महाराष्ट्र माझा"  या सामुहिक राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
शिवजयंती कार्यक्रमाचे संचालन कु.फाल्गुनी महाकुलकार व कु.स्वरा भगत यांनी केले. कु.युतिका चव्हाण हिने आभार मानले. सौ.निलीमा बावणे यांचे सह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad