कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार वामनराव कासावार होते. तर अध्यक्ष हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे होते. राजेंद्र गायकवाड, नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, प्रा. शंकर व-हाटे, नरेंद्र ठाकरे, राजाभाऊ पाथ्रडकर, अरुणा खंडाळकर, प्रमोद वासेकर, संजय निखाडे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या हस्ते पटाच्या मैदानाची पूजा करण्यात आली. त्यानंतर रितसर फित कापून पटाचे उद्घाटन करण्यात आले. पहिली उद्घाटनपर जोडी ही श्रृती वाळगे या 18 वर्षीय तरुणीने हाकली. त्यानंतर वणी विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित गावगाडा या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील 30 बैलजोड्या हाकण्यात आल्या.
बुधवारी मुख्य विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात झाली. दुस-या दिवशी 40 पेक्षा अधिक जोड्या हाकण्यात आल्या. गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 कार्यक्रमाची सांगता व बक्षिस वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे यांच्या मार्गदर्शनात संजय खाडे मित्रपरिवार परिश्रम घेत आहे.
राधाने गाजवले मैदान
"गावगाडा स्पर्धेत रांगणा येथील शेतकरी गुणवंत वांढरे यांच्या तेजा व वायफर या जोडीने अवघ्या 8.1 सेकंदात अंतर कापत पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे राजूर इजारा येथील भाविका मिलमिले व गणेशपूर (वणी) येथील कु. राधा बोबडे या दोन तरुणींनी सहभाग घेतला होता. राधा हिने मैदान गाजवत अवघ्या 8.33 सेकंदात अंतर कापत पाचवा क्रमांक पटकावला. या दोन्ही तरुणीच्या जिद्दीचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले."



